मुंबई

मूळ संविधानाची प्रत, दुर्मिळ ग्रंथ, बाबासाहेबांचे हस्तलिखित

CD

संविधान दिन विशेष
मूळ संविधानाची प्रत, दुर्मिळ ग्रंथ, बाबासाहेबांच्या नोट्स
‘सिद्धार्थ’ने जपल्या खाणाखुणा

मयूर फडके : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये प्रस्थापित करणारे भारतीय संविधान स्वीकारले तो २६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय संविधान निर्मिती प्रक्रियेच्या खाणाखुणा समजून घ्यायच्या असतील, तर दक्षिण मुंबईतील फोर्टच्या सिद्धार्थ महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला आवर्जून भेट द्यायला हवी. या ग्रंथालयात संविधानाची मूळ प्रत, कच्चा मसुदा तसेच संविधान लिहिण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काढलेल्या नोट्स, शेकडो पुस्तके जतन करून ठेवली आहेत; मात्र निधीअभावी या अमूल्य ग्रंथसंपदेच्या संवर्धनाचा प्रश्न कायम आहे.
सिद्धार्थ महाविद्यालयाचे हे ग्रंथालय अनेक अर्थांनी अमूल्य मानले जाते. या ग्रंथालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःचे अनेक ग्रंथ भेट दिले आहेत. यात विविध देशांच्या लोकशाही प्रक्रियांशी संबंधित १,७००हून अधिक ग्रंथांचा समावेश आहे. यामध्ये इंग्लंडमधील हाउस ऑफ कॉमन्सच्या संसदीय कामकाजाशी संबंधित ब्रिटिश डिबेट्स, कॉन्स्टिट्युशन असेंब्ली लेजिस्लेटिव्ह डिबेट्स अशा खंडांचा, तर मॅन्युअल गव्हर्नमेंट ऑफ युनायटेड स्टेट्स, कॉन्स्टिट्यूशन हिस्ट्री ऑफ इंडिया (लेखक - किथ) यांसारखे दुर्मिळ ग्रंथ येथे उपलब्ध आहेत. असे म्हटले जाते की भारतीय प्रजासत्ताक आणि लोकशाही प्रणालीची मूलभूत संकल्पना बाबासाहेबांनी गौतम बुद्धांच्या भिक्षू संघातून घेतली होती. या संकल्पनेचा आधार मानल्या जाणाऱ्या ‘गॉस्पेल ऑफ बुद्धा’ या ग्रंथाची मूळ प्रतही ग्रंथालयाने जतन केली आहे.
...
संविधानाची मूळ प्रत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वाक्षरीची मूळ संविधान प्रत आजही सिद्धार्थ कॉलेजच्या ग्रंथालयात जपून ठेवली आहे. यासोबतच मसुदा समितीने घटना समितीपुढे सादर केलेल्या मसुद्याची प्रतही येथे आहे. काळाच्या ओघात संविधानाची ही प्रत आता जीर्ण होत चालली आहे.
...
‘कॉन्स्टिट्यूशनल डायरी’
घटना लिहिताना बाबासाहेबांनी जगभरातील असंख्य पुस्तकांचा अभ्यास केला होता. यासोबत त्यांनी असंख्य डायऱ्यांमध्ये संविधानासंबंधी अनेक महत्त्वाच्या टिप्पण्‍या नोंदवून ठेवल्या होत्या. या टिप्पण्यांतील मजकूर पुढे संविधान निर्मितीच्या प्रक्रियेचा अविभाज्य भाग ठरला. ग्रंथालयाने या डायरीतील संविधानाशी संबंधित टिप्पण्या वेगळ्या करून त्याची एक स्वतंत्र ‘कॉन्स्टिट्युशनल डायरी’ तयार केली आहे. डॉ. आंबेडकर यांच्या हस्ताक्षरातील या नोट्स वाचणे हा एक वेगळाच अनुभव आहे.
...
बाबासाहेबांची खुर्ची
संविधान निर्मितीसाठी अभ्यास, आवश्यक संदर्भ आणि टिप्पण्या तयार करताना डॉ. बाबासाहेब ज्या खुर्चीवर बसत ती खुर्च सिद्धार्थच्या ग्रंथालयात जपून ठेवण्यात आली आहे.
...
संवर्धनाचे आव्हान
या ग्रंथालयात असंख्य पुस्तके दुर्मिळ आणि १०० वर्षांहून जुनी आहेत. या पुस्तकांचे संवर्धन करण्यासाठी आवश्यक निधी संस्थेकडे उपलब्ध नाही. खासगी संस्थेमार्फत काही पुस्तकांचे संवर्धन करण्यात आले आहे, तर सीएसआर निधीतून काही ग्रंथांच्या डिजिटायझेशनचे काम केले आहे. मात्र संविधानाच्या मूळ प्रतीचे संवर्धन करणे हा आमच्यापुढचा सर्वात मोठा प्रश्न असल्याचे मुख्य ग्रंथपाल चैताली शिंदे यांनी सांगितले.
...
भारतीय संविधानासंदर्भातील अनमोल खजिना सिद्धार्थ कॉलेजमध्ये आहे. या ग्रंथांचे जतन करणे आणि हा वारसा पुढील पिढीकडे सोपवणे हे आमच्यापुढील सर्वांत मोठे आव्हान आहे.
- प्रा. विजय मोहिते, सिद्धार्थ महाविद्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इराणने होर्मुझची सामुद्रधुनी केली पूर्ण बंद, जहाज पेटवून देण्याचा इशारा; तेलाच्या किंमतीचा भडका उडणार, आशियाई देशांना फटका

Latest Marathi News Live Update : हॉर्मुझ सामुद्रधुनीतील तणावाने तेलदरात उसळी

Dr. Janardan Waghmare : लातूर पॅटर्नचे शिल्पकार डॉ. जनार्दन वाघमारे यांचे निधन; शिक्षण क्षेत्रातील एक देदीप्यमान पर्व संपले

Iran Israel War News : मध्यपूर्वेत महायुद्ध पेटले! इराणचा इस्रायलवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला; अमेरिकेचे 'ऑपरेशन एपिक फ्युरी' सुरू, ५५५ जणांचा मृत्यू

Supreme Court: न्यायाधीशांनी AI चा वापर करून लिहिला निकाल, अस्तित्वातच नसलेल्या खटल्यांचा संदर्भ; सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?

SCROLL FOR NEXT