मुंबई

महापालिकेचा कुष्ठरोग निर्मूलनासाठी पुढाकार

CD

महापालिकेचा कुष्ठरोग निर्मूलनासाठी पुढाकार
शहरात व्यापक सर्वेक्षण मोहीम सुरू
कल्याण, ता. २६ (बातमीदार) : महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत शहरात व्यापक सर्वेक्षण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचा उद्देश महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचून कुष्ठरोगाविषयी जनजागृती करणे आणि संभाव्य रुग्णांची ओळख पटविणे हा आहे.
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, नागरिकांमध्ये कुष्ठरोगाची लक्षणे जसे की त्वचेवर डाग पडणे, सुन्नपणा किंवा बोटांमध्ये विकृती आढळल्यास त्वरित जवळच्या नागरी आरोग्य केंद्रात तपासणी करून घेणे अत्यावश्यक आहे. कुष्ठरोगाबाबत कोणतीही भीती बाळगू नये. कारण सर्व शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयांमध्ये या रोगाचे मोफत निदान व उपचार उपलब्ध आहेत. योग्य वेळी उपचार घेतल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

सविस्तर मार्गदर्शन
मोहिमेदरम्यान आरोग्य कर्मचारी चाळी, इमारतींसह विविध लोकवस्त्यांमध्ये जाऊन घराघरातील सदस्यांची माहिती संकलित करत आहेत.नागरिकांना कोणकोणते आजार आहेत, तसेच कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यास काय करावे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन पालिकेकडून दिले जात आहे.

काय आहेत लक्षणे ?
१) त्वचेवर पांढुरके, तांबूस किंवा गडद रंगाचे चट्टे दिसणे आणि त्या भागाला स्पर्श केल्यावर जाणवणारी संवेदना कमी होणे किंवा पूर्ण सुन्न होणे.
२) हात, पाय किंवा बोटांमध्ये मुंग्या येणे, सुन्नपणा वाटणे किंवा गरम–थंड, टोचल्यास वेदना कमी जाणवणे.
३) हात-पायात स्नायू कमकुवत होणे, बोटे वाकडी होणे किंवा पकड कमी होणे.
४) चेहरा, कान, हात-पाय यांची त्वचा जाड झाल्यासारखी वाटणे किंवा गाठीसारखे उठाव दिसणे.
५) डोळे कोरडे पडणे, नीट मिटता न येणे किंवा दृष्टी धूसर होणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकाकडून बेदम मारहाण; जिल्हा परिषद शाळेतील संतप्त प्रकार, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

Junnar Crime : लग्नास नकार; जुन्नरमध्ये विद्यार्थिनीवर तरुणाचा कोयत्याने हल्ला, विद्यार्थिनी गंभीर जखमी

Hardik Pandya: हार्दिक पांड्याविरोधात पुणे पोलिसात तक्रार; तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप

Cyber Crime : दहा कोटींच्या सायबर फसवणूकप्रकरणी सोलापूरमधून आरोपीला अटक

Monalisa Marriage: मुस्लिम तरुणासोबत लग्न केलं; पण वडिलांची भीती, घाबरलेल्या मोनालिसाची पोलिसात धाव अन्... व्हायरल गर्ल पुन्हा चर्चत

SCROLL FOR NEXT