पुनर्विकासाचा नव्याने आराखडा
‘जोगेश्वरी पीएमजीपी’बाबत म्हाडाच्या हालचाली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या जोगेश्वरी पीएमजीपी वसाहतीचा पुनर्विकास म्हाडा स्वत: करणार असून, त्याचा आराखडाही तयार झाला आहे. मात्र वसाहतीमधील रहिवाशांनी टाॅवर पार्किंगला विरोध करतानाच तळमजला आणि त्याखाली पार्किंग मिळायला हवे, अशी मागणी म्हाडाकडे केली आहे. त्या पार्श्वभूमीवर म्हाडाने आता पुन्हा नव्याने पुनर्विकासाचा आराखडा तयार करण्याच्या हलचाली सुरू केल्या आहेत. तसेच नव्या आराखड्यानुसार प्रकल्प व्यवहार्य होईल का, याचीही तपासणी केली जाणार असल्याचे समोर आले आहे.
१९९०च्या दशकात पंतप्रधान अनुदान प्रकल्पांतर्गत जोगेश्वरी पीएमजीपी वसाहत उभारली असून, त्यामध्ये चारमजली १७ इमारती आहेत. त्यानुसार ९४२ निवासी आणि ४२ अनिवासी असे एकूण ९८४ गाळे आहेत. संरचनात्मक अहवालानुसार या इमारती अत्यंत जीर्णावस्थेत आहेत. या वसाहतीच्या पुनर्वसन व विक्री घटकाचे बांधकाम करण्यासाठी म्हाडाने राज्य सरकारकडून अंतिम मंजुरी घेतली आहे. तसेच प्रकल्पासाठी ईपीसी कंत्राटदार म्हणून बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनीची निवड केली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ४७३ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. दरम्यान, येथील रहिवासी आणि लोकप्रतिनिधींची सोमवारी म्हाडासोबत बैठक झाली. त्यामध्ये त्यांनी मूळ इमारतींच्या तळमजल्यावर पार्किंग देण्याची मागणी केली आहे. त्याबरोबरच अन्य मागण्याही त्यांनी नोंदवल्या आहेत.
...
संबंधित विभागाला निर्देश
म्हाडाने सध्या १७ मजली इमारती उभारण्याचा आराखडा तयार केला होता; मात्र आता रहिवाशांकडून आलेल्या नव्या मागणीच्या पार्श्वभूमीवर म्हाडाने नव्याने आराखडा तयार करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले असल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, प्रकल्पाच्या व्यवहार्यतेवर सर्व बाबी अवलंबून असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.