मुंबई

नव्या कामगार कायद्याला जमिनीत गाडा

CD

नव्या कामगार कायद्याला जमिनीत गाडा
कामगार संघटनांना सचिन आहिर यांचे आवाहन
सकाळ वत्तसेवा
मुंबई, ता. २५ : शंभर वर्षांपूर्वीच्या लढ्यातून मिळविलेले २९ कामगार कायदे निर्दयीपणे पायदळी तुडवून, हुकुमशाही पद्धतीने चार कामगार संहिता सर्व राज्यांना लागू करणाऱ्या भाजपचे प्रयत्न हाणून पाडा. यासाठी सर्व कामगार संघटनांनी रस्त्यावर उतरावे अन्यथा भविष्यात युवा कामगार आपल्याला कधीच माफ करणार नाही, असे राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आणि आमदार सचिन अहिर यांनी म्हटले आहे.

नवीन संहितेत कामगाराच्या श्रमाचे व बुद्धीचे मूल्यमापन नाही. कामगार संघटनांच्या नोंदणीसंदर्भात सर्व अधिकार मालकांना दिलेले आहेत. त्यामुळे मालक आपल्या मर्जीने निर्णय घेणार आहेत. आपल्या हक्कासाठी कोणाकडे दाद मागणार, हा प्रश्न आहे. नव्या संहितेत फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट असूनही नोकरीची शाश्वती नाही, असे सचिन अहिर यांनी सांगितले.
......
एकत्र येण्याचे आवाहन
संसदेत बहुमताच्या जोरावर हे विधेयक मंजूर केले आहे. महाराष्ट्रात याची अंमलबजावणी करण्याविरोधात राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाने कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा नेला होता. या कायद्याविरोधांत सर्व कामगार संघटनांनी एकत्र येत आवाज उठवण्याचे आवाहन सचिन अहिर यांनी केले.
...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL २०२६ शेड्यूल कधी जाहीर होणार? तारीख आली समोर; BCCI सचिवांनी मोठा ट्विस्टही सांगितला!

Mutual Fund: फेब्रुवारीत गुंतवणूकदारांचा बदलला मूड! कोणत्या फंडांमध्ये वाढली गुंतवणूक? गोल्ड ETF गुंतवणुकीत मोठा बदल

Kannad News : कन्नडमध्ये अखेर युतीचं सुत जुळलं; सुप्रिया घुगे सभापती तर माया सुराशे उपसभापती

Horoscope : मिथुन राशीत गुरु मार्गी गोचर; 11 मार्चपासून धनुसह 'या' 5 राशींसाठी शुभलाभ संयोग, धनलाभ, कामात यश अन् जीवनात मोठा बदल

मोठी बातमी : T20 World Cup विजेत्या भारतीय खेळाडूवर आयसीसीची दंडात्मक कारवाई! 'ती' चूक महागात पडली

SCROLL FOR NEXT