एकाच व्यक्तीचे १०३ वेळा नाव
मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत घोळ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत एकाच व्यक्तीचे नाव दुबार नाही, तर तब्बल १०३ वेळा नोंदविण्यात आल्याचे समोर आले आहे. तसेच चार लाख ३३ हजार मतदारांची नावे एकापेक्षा अधिक वेळा आहेत. त्यामुळे हे मतदार एकापेक्षा अधिक ठिकाणी मतदान करणार नाहीत, याबाबत निवडणूक आयोगासमोर आव्हान असणार आहे.
मुंबई पालिकेची आरक्षण सोडत निघाल्यानंतर २० नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी जाहीर झाली. त्यानुसार मुंबईत एक कोटी तीन लाख मतदार आहेत; मात्र यादीत एका व्यक्तीचे नाव तब्बल १०३ वेळा असल्याचे समोर आले आहे. याशिवाय चार लाख ३३ हजार नावे अनेक वेळा आल्याने त्यांना एकाच ठिकाणी मतदान करावे, यासाठी निवडणूक आयोग २७ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत घरोघरी विशेष मोहीम राबवणार आहे. दरम्यान, प्रभाग क्रमांक १९९मध्ये सर्वाधिक आठ हजार २०७, तर प्रभाग क्रमांक २२७मध्ये सर्वात कमी दोन हजार ९८ दुबार मतदार आहेत.
...........
सर्वाधिक दुबार मतदार
प्रभाग क्रमांक मतदारांची संख्या
१९९ ८,२०७
२०५ ७,५८५
१९४ ७,५८४
२०३ ७,६२४
२०२ ७,४७०
----
सर्वात कमी दुबार मतदार
प्रभाग क्रमांक मतदारांची संख्या
२२७ २,०९८
१ २,१४२
१८७ २,४२६
१३४ २,५८६
१८३ २,६११
----
हमीपत्र भरून घेणार
निवडणूक आयोगाकडून दुबार मतदार असलेल्या मतदारांशी २७ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरदरम्यान संपर्क केला जाणार आहे. त्यांना परिशिष्ट १ अर्ज भरावा लागेल. अर्ज न भरलेल्या मतदारांच्या नावासमोर स्टार असेल. त्यामुळे अशा मतदारांचे नाव दुबार असल्याचे लक्षात येईल. तसेच मतदानाच्या दिवशी संबंधित मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करणार असल्याचे हमीपत्र भरून द्यावे लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.