मुंबई

बदलापुरात शिवसैनिकांचा पोलिसांकडून छळ

CD

बदलापुरात शिवसैनिकांचा पोलिसांकडून छळ
शिंदे गटाचा भाजपवर निशाणा
बदलापूर, ता. २६ (बातमीदार) ः बदलापूर नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्ताधारी पक्षाकडून पोलिसांचा गैरवापर होत असल्याचा आणि शिवसैनिकांना (शिंदे गट) जाणूनबुजून त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप शहरप्रमुखांनी केला आहे. कात्रप तलाव येथील प्रचारसभेत कार्यकर्त्यांनी आपली व्यथा मांडल्यानंतर युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी भाजपचे नाव न घेता, ‘सत्तेचा गैरवापर करून दहशत निर्माण करणे थांबवा, अन्यथा थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार दाखल करू,’ असा स्पष्ट इशारा दिला आहे.

बदलापुरात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप-राष्ट्रवादी युती एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. याच पार्श्वभूमीवर, सरनाईक यांनी केंद्रस्थानी असलेल्या सत्ताधाऱ्यांवर (भाजपवर) रोख ठेवत, प्रशासनावर दबाव टाकून त्रास दिला जात असल्याचा आरोप केला आहे. कात्रप तलाव येथील प्रचारसभेत पूर्वेश सरनाईक यांनी मतदार याद्यांमधील गोंधळावरही जोरदार टीका केली. हा गोंधळ केवळ अंबरनाथपुरता मर्यादित नसून बदलापूर, मिरा-भाईंदर आणि ठाण्यातही मोठ्या तफावती असल्याचे त्यांनी नमूद केले.

संबंधितांवर कारवाई
घोळ जर अधिकाऱ्यांच्या संगनमताने होत असेल, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संपूर्ण मंत्रिमंडळ संबंधितांवर कारवाई करेल, असा विश्वासही सरनाईक यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT