उल्हासनगर, ता. २६ (वार्ताहर) : हरवलेल्या मुलीचा शोध लागणे म्हणजे फक्त पोलिसांची कर्तव्यपूर्ती नसून एका कुटुंबाला पुन्हा जगण्याची आशा मिळण्याचा क्षण असतो. विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात दाखल अपहरणाच्या गुन्ह्यातील १६ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याने परिसरात चिंतेचे वातावरण पसरले होते. तांत्रिक तपास आणि तत्पर कारवाईच्या बळावर ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष पथकाने अखेर या शोध मोहिमेला सुखद शेवट दिला. मुलगी वापी (जि. वलसाड, गुजरात) येथे सुरक्षित अवस्थेत आढळली.
अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीय हतबल झाले होते. परिस्थितीच्या गांभीर्याची दखल घेत पथकाने समांतर तपास सुरू केला. तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर करत कॉल डिटेल्स, लोकेशन ट्रॅकिंग आणि सीसीटीव्ही फूटेजचे सखोल विश्लेषण करण्यात आले. तपासाच्या धाग्यांनी दिशा दाखवत अखेर मुलगी वापी येथे असल्याचे संकेत स्पष्ट झाले. तत्काळ स्थानिक पोलिसांशी समन्वय साधत शोध मोहीम राबवण्यात आली आणि मुलगी सुरक्षित सापडली.
या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक स्नेहल शिंदे, हवालदार पाटील आणि अंमलदार थोरात यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तांत्रिक तपास, त्वरित निर्णयक्षमता आणि संवेदनशीलतेचा समन्वय साधत ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला. सापडलेली मुलगी पुढील वैधानिक प्रक्रियेनंतर विठ्ठलवाडी पोलिसांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आली असून कुटुंबीयांनाही ही आनंदाची बातमी कळवण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.