नगर परिषद निवडणुकीत घराणेशाही जिंदाबाद!
अंबरनाथ-बदलापूरमध्ये जोडपी, भावंडे, सासू-सून, बाप-लेक मैदानात
अंबरनाथ/बदलापूर, ता. २६ ः अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर नगर परिषद निवडणुकीत यंदा खऱ्या अर्थाने ‘फॅमिली ड्रामा’ पाहायला मिळत आहे. घराणेशाहीचा नारा देत मातब्बर नेत्यांचे अख्खे कुटुंब निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहे. अनेक ठिकाणी जोडपी, भावंडे, सासू-सून, माय-लेक आणि बाप-लेक असे ‘फॅमिली पॅक’ उमेदवार थेट निवडणुकीत एकमेकांसमोर किंवा एकाच बाजूने उभे आहेत. दोन्ही नगर परिषदांमध्ये अनेक दिग्गजांनी आपली कौटुंबिक ताकद पणाला लावल्यामुळे यंदाची निवडणूक अधिक रुचकर आणि लक्षवेधी ठरली आहे.
अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये प्रामुख्याने शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध भाजप अशी थेट निवडणूक होणार असली तरी ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आव्हानही कायम आहे. दोन्ही नगर परिषदा प्रथमच पॅनेल पद्धतीने निवडणुकांना सामोरे जात असल्याने प्रभागात वर्चस्व सिद्ध करण्यासाठी ही ‘कौटुंबिक जत्रा’ पाहायला मिळत आहे.
अंबरनाथमध्ये २९ प्रभागांसाठी २६०, तर नगराध्यक्षपदासाठी आठ उमेदवार रिंगणात आहेत. दुसरीकडे, बदलापूरमध्ये २४ प्रभागांतील ४९ नगरसेवकपदांसाठी १६१ आणि नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. बदलापूरमध्ये एका नेत्याच्या कुटुंबातील तब्बल सहा सदस्य निवडणुकीत आहेत, तर अंबरनाथमध्ये एका दिग्गज नेत्याच्या ‘भावकीत’ फूट पडून दोन वेगवेगळ्या पक्षांतून सदस्य निवडणूक लढवत आहेत.
कौटुंबिक जत्रा
बदलापूर
म्हात्रे कुटुंब
पक्ष - शिवसेना शिंदे गट
उमेदवार प्रभाग
१) वामन म्हात्रे - कुटुंबप्रमुख - प्रभाग १९ ब
२) वीणा म्हात्रे - पत्नी - थेट नगराध्यक्ष
३) तुकाराम म्हात्रे - भाऊ - प्रभाग १ ब
४) उषा म्हात्रे - भावजय - प्रभाग ९ अ
५) वरुण म्हात्रे - मुलगा - प्रभाग ३ ब
६) भावेश म्हात्रे - पुतण्या - प्रभाग २१ ब
राऊत कुटुंब
पक्ष - शिवसेना शिंदे गट/भाजप
उमेदवार प्रभाग
१) प्रवीण राऊत - कुटुंबप्रमुख - प्रभाग १७ ब
२) शीतल राऊत - पत्नी - (बिनविरोध) प्रभाग १९ अ
३) विजया राऊत - भावजय - प्रभाग १८ अ
भाजपकडून उमेदवारी
४) संदेश राऊत - पुतण्या - प्रभाग २३ ब
५) अश्विनी धारवे - पुतणी - प्रभाग २३ अ
पाटील कुटुंब १
पक्ष - शिवसेना शिंदे गट
उमेदवार व प्रभाग
१) रोहन पाटील - कुटुंबप्रमुख - प्रभाग १६ ब
२) प्रथमेश पाटील - चुलत भाऊ - प्रभाग १५ क
३) वैशाली पाटील - चुलती - प्रभाग १६ अ
नवरा- बायको- बहीण
१) श्रीधर पाटील - स्वतः - प्रभाग ४ ब ( शिंदे गट)
२) स्वप्ना पाटील - पत्नी - प्रभाग ४ अ (शिंदे गट)
३) रिद्धीता घोरपडे - बहीण - प्रभाग ७ अ (भाजप)
काका-पुतण्या विरोधात
भाजपचे उमेदवार मोहन चतुरे हे प्रभाग क्रमांक २ ब मधून निवडणूक लढवत असून त्यांच्याविरोधात त्यांचे पुतणे हेमंत चतुरे हे शिंदे गटाकडून निवडणूक लढवत आहेत.
भाऊ-बहीण जोडी
पक्ष - शिवसेना शिंदे गट
१) संदेश ढमढेरे - भाऊ - प्रभाग ९ ब
२) सोनिया ढमढेरे - बहीण - प्रभाग ८ अ
आठ विविध प्रभागांत श्री व सौ रिंगणात
पक्ष - शिवसेना शिंदे गट
१) मुकुंद भोईर - प्रभाग २० ब
२) जयश्री भोईर - प्रभाग ७ अ
पक्ष - भाजप
उमेदवार व प्रभाग
१) रमेश सोळसे - प्रभाग २२ ब
२) हर्षदा सोळसे - प्रभाग २२ अ
१) सूरज मुठे - प्रभाग १३ ब
२) संध्या मुठे - प्रभाग १२ अ
१) संभाजी शिंदे - प्रभाग १४ ब
२) ऊर्मिला शिंदे - प्रभाग १६ अ
१) शरद तेली - स्वतः - प्रभाग ३ ब
२) कविता तेली - पत्नी - प्रभाग ४ अ
१) राजेंद्र घोरपडे - प्रभाग ७ ब
२) रुचिता घोरपडे - पत्नी - थेट नगराध्यक्ष उमेदवार व नगरसेविका उमेदवार प्रभाग ३ अ
राष्ट्रीय समाज पक्ष
१) रूपेश थोरात - प्रभाग १३ ब
२) सुषमा थोरात - प्रभाग १३ अ
महाविकास आघाडी
१) प्रशांत पालांडे - प्रभाग २० ब
२) प्राची पालांडे - प्रभाग २० अ
अंबरनाथ
१) अंबरनाथ शहरात शिंदे गटाचे शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या पत्नी, माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांना थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली आहे. त्यांचा मुलगा निखिल आणि अरविंद वाळेकरांचे बंधू राजेंद्र वाळेकरही रिंगणात आहेत.
२) वाळेकरांशी दुरावलेले त्यांच्याच बंधूंच्या कुटुंबीयांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्या कुटुंबातील पवन वाळेकर आणि त्यांच्या मातोश्री मीना वाळेकर निवडणूक लढवत आहेत.
३) शिवसेना शिंदे गटाच्या करुणा रसाळ आणि त्यांचा मुलगा रोहन रसाळ, कुणाल व त्यांच्या पत्नी अपर्णा भोईर यांनाही उमेदवारी मिळाली आहे.
४) भाजपने नगराध्यक्षपदासाठी भाजप प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले यांच्या सून तेजश्री करंजुले यांना मैदानात असून करंजुलेंचे पुत्र अभिजित आणि पत्नी अल्पना करंजुले याही रिंगणात आहेत.
५) काँग्रेसमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नूतन पाटील, तर त्यांचे पती ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील आणि मुलगा विपुलही निवडणुकीच्या रिंगणात आहे.
६) अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शहर अध्यक्ष सदाशिव पाटील, त्यांचा मुलगा सचिन पाटील हे पिता-पुत्र मैदानात आहेत. तर त्यांची सून अश्विनी सचिन पाटील नगराध्यक्षपदासाठी रिंगणात आहेत.
७) शिवसेना शिंदे गटाचे कुणाल भोईर, अर्पणा भोईर, चंद्रकांत भोईर, जोत्स्ना भाईर हे दाम्पत्यही नशीब अजमावत आहेत.
८) सावित्री गुप्ता, प्रमोद गुप्ता यांच्यासह चार ठिकाणी माय-लेक निवडणूक लढवत आहेत.
...........................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.