मैदानाच्या दुरवस्थेने खेळाडू नाराज
नेरूळ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिकेच्या सानपाडा येथील हुतात्मा बाबू गेनू सईद मैदानाची दुरवस्था झाली आहे. याप्रकरणी स्थानिक खेळाडूंनी प्रशासनाचा कारभाराविषयी संताप व्यक्त केला आहे. सानपाडा परिसरात चांगल्या प्रकारची खेळाची मैदाने तसेच उद्याने उपलब्ध आहेत; परंतु देखभाल दुरुस्तीअभावी मैदानांना बकालपणा आला आहे. सोसायटीमधील रहिवासी मैदानांमध्ये गाड्या उभ्या केल्या जातात. त्यामुळे गाड्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी मैदानात खेळण्यास मनाई केली जात आहे. याचबरोबर विविध राजकीय पक्ष, संस्था यांचे सामाजिक कार्यक्रम झाल्यानंतर मैदानात खड्डे, डेब्रिज इतरत्र पडलेले असल्याने याप्रकरणी महापालिका अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
ः---------------------------------
रहदारीच्या रस्त्यांवरील अतिक्रमणाचा त्रास
खारघर (बातमीदार) ः शहरातील सेक्टर ३५च्या मेट्रो पुलाखाली खासगी कंपनीच्या ३० ते ४० खासगी बस उभ्या केल्या जातात. काही गॅरेज व्यावसायिक रस्ते आणि पदपथावर वाहने दुरुस्तीचा व्यवसाय करीत असल्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे अशा बेकायदा पार्किंगविरोधात कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी डॉ. स्वप्नील पवार यांनी खारघर वाहतूक शाखेला दिले आहे. या कंपनीच्या बस रात्रभर उभ्या असतात. काही गॅरेज व्यावसायिकांनी रस्ते आणि पदपथांवर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने कारवाई करून पदपथ मोकळे करावे, अशी मागणी स्वप्नील पवार यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.