मुंबई

मुलुंडमध्ये अर्थ प्रबोधन व्याख्यानमाला

CD

मुलुंडमध्ये अर्थ प्रबोधन व्याख्यानमाला
मुलुंड, ता. २६ (बातमीदार) ः महाराष्ट्र सेवा संघाच्या अर्थ विभागातर्फे रिव्हर्स मॉर्गेज आणि मालमत्तेचे वारसांना सुलभ हस्तांतरण या विषयावर एका व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. वृद्धापकाळात एखाद्या व्यक्तीकडे फक्त घराची मालमत्ता असून मासिक उत्पन्न नसेल, तर रिव्हर्स मॉर्गेज या सुविधेचा लाभ घेऊन ती व्यक्ती आर्थिक अडचणींवर कशी मात करू शकते, आपली मालमत्ता वारसाला हस्तांतर करण्यासाठी कायदेशीर योग्य सुलभ पद्धत कोणती याचे प्रबोधन करण्यासाठी सुप्रसिद्ध ॲड. मनीषा अभ्यंकर यांना आमंत्रित केले आहे. मनीषा अभ्यंकर या उपस्थितांना या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. ही व्याख्यानमाला शनिवारी (ता. २९) सेवा संघाच्या सुविधा शंकर गोखले सभागृह येथे सायंकाळी ५ ते ७ या कालावधीत आयोजित केली आहे. कार्यक्रमाला प्रवेश मोफत असून सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Latest News: युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बंदोबस्त वाढवला; शहरात किती इराणी लोक राहतात?

एकदाचं ठरलं! पंचायत समित्यांचे सभापती-उपसभापती १२ मार्चला तर १८ मार्चला ठरणार झेडपीचे अध्यक्ष; हात उंचावून सदस्य करणार मतदान, वाचा...

भावाशी बोललो! इस्रायल इराण युद्धानंतर पीएम मोदींचा आखाती देशांच्या प्रमुखांना कॉल, काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update: शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत?

Leopard Caught : नागापूर येथे एका महिन्यात चार बिबटे जेरबंद

SCROLL FOR NEXT