मुंबई

निष्पाप मुलांच्या जिवाशी खेळ

CD

निष्पाप मुलांच्या जीवाशी खेळ
रस्त्याच्या विरुद्ध दिशेने स्कूल बस धावली
खारघर, ता. २६ (बातमीदार) ः शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर स्कूल बस चुकीच्या दिशेने धावत असल्याचा फोटो एका जागरूक नागरिकाने सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. निष्पाप मुलांचा जीव धोक्यात घालणाऱ्या बसचालकाविरोधात कारवाईची मागणी होत आहे. रस्त्याच्या वर्दळीच्या रस्त्यावर चुकीच्या दिशेने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशातच मंगळवारी खारघरमध्ये एका स्कूल बसचालक चुकीच्या बाजूने येत असल्याचे रिषभ प्रधान यांच्या निदर्शनास आले. हा प्रकार वाहन कायद्याच्या विरोधात असल्याचे सांगितले; पण स्कूल बसचालकाने उद्धटपणे उत्तर दिल्याने अशा चालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
----------------------------------------
चालकाचे अजब उत्तर
सेक्टर १३ मार्गावर हा प्रकार घडला आहे. स्कूल बसचालकांना जाब विचारला असता, मी महाराष्ट्रीयन आहे. चुकीच्या बाजूने चालवू शकतो, दररोज करतो, असे सांगितले. त्याच्याशी मराठीत संवाद साधला तेव्हा नरमाईची भूमिका घेतली. खारघरमध्ये इतरही स्कूल बसचालक अशाप्रकारे विद्यार्थी वाहतूक करीत असावेत. यासाठी वाहतूक विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे दंडात्मक कारवाईची मागणी केली आहे.
---------------------------------
स्कूल बसचालकाने वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. उलट्या दिशेने बस चालवत असेल तर योग्य ती कारवाई केली जाईल.
- योगेश शितोळे, मोटार वाहन निरीक्षक, उपप्रादेशिक परिवहन विभाग, पनवेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT