मुंबई

रोहयो अंतर्गत वनराई बंधारे बांधा : रब्बी पिकाना पाणी देण्यासाठी होतो उपयोग

CD

रोहयोअंतर्गत वनराई बंधारे बांधा
पाणीटंचाई टाळून रब्बी पिकांना आधार
विक्रमगड, ता. २६ (बातमीदार) ः विक्रमगड तालुक्यात चांगला पाऊस होऊनही पाणी अडवण्याच्या नियोजनाअभावी उन्हाळ्यात पाण्याची पातळी खालावते. ही संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी रोजगार हमी योजने (रोहयो)अंतर्गत वनराई बंधारे बांधण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद महाकाळ यांनी नुकतीच सरकारकडे केली आहे.
नदी-नाले/ओहळांमधील वाहून जाणारे पाणी सिमेंटच्या पोत्यांमध्ये माती भरून बांधलेल्या या बंधाऱ्यांमुळे अडवले जाईल, जेणेकरून जमिनीत पाणी मुरून विहिरी व इतर जलस्रोतांची पातळी वाढेल. बंधाऱ्यांचे पाणी चार-पाच महिने साठून राहत असल्याने लगतच्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामात काकडी, वांगी, भेंडी, टोमॅटो यांसारखी भाजीपाला पिके घेऊन चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो. दिवाळीनंतर रोजगार नसल्याने स्थलांतर करणाऱ्या मजुरांना ग्रामपंचायत स्तरावर वनराई बंधारे बांधल्यास मोठा रोजगार उपलब्ध होईल आणि स्थलांतर कमी होईल, असे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे विक्रमगड तालुक्यातील ४३ ग्रामपंचायत क्षेत्रांत हे बंधारे त्वरित बांधावेत, अशी मागणी शेतकरी व मजूरवर्गाकडून जोर धरू लागली आहे.
------------------
खर्च कमी
वनराई बंधाऱ्यांना कोणत्याही प्रकारची देखरेख, डागडुजी वा दुरुस्ती करावी लागत नाही. वनराई बंधारे बांधण्यासाठी रिकाम्या पोत्यांची किंमत वगळता कोणतेही तांत्रिक ज्ञान किंवा मोठा खर्च लागत नाही; हे श्रमदानातून शक्य आहे.
------------------
वनराई बंधारे बांधल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. पाणी अडवा पाणी जिरवाप्रमाणे नदी, नाले, ओहळावर वनराई बंधारे बांधल्यास वाहणारे पाणी जमिनीत मुरते व नदी, नाले, विहिरीची पातळी वाढण्यास मदत होते. या वनराई बंधाऱ्यांच्या लगत असलेल्या शेतकऱ्यांना तीन-चार महिन्यात होणारे दुबार रब्बी भाजीपाला पिके घेता येतील व चांगला आर्थिक फायदा मिळवता येईल.
- मिलिंद महाकाळ, सामाजिक कार्यकर्ते, विक्रमगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sidharth Malhotra's Father Passes Away : सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन!, भावूक होत केली पोस्ट अन् म्हणाला...

Bhigwan Crime : आई अन् भावाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून तरुणीचे दोघांकडून अपहरण

Car Accident : भरधाव मोटारीच्या धडकेत बालकाचा मृत्यू; तिघे जण गंभीर जखमी

Pune Traffic: गुरुवारी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? कोणते रस्ते सुरु? वाचा सविस्तर

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

SCROLL FOR NEXT