जव्हार, ता. २७ (बातमीदार) : प्रत्येक निवडणुकीत नागरिकांना पायाभूत सुविधा देत चांगले जीवनमान जव्हार शहरात उपलब्ध होईल, अशी आशा लागलेली असते, मात्र गेल्या अनेक दशकांपासून केवळ रस्ते कामांवर विकास निधी खर्च केला गेला आहे. त्यामुळे पाणी, स्वच्छता या पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही मतदारांना आश्वासनांचे गाजर मिळणार, असे मतदारराजा खेदाने बोलत आहे.
शहराला पाणीपुरवठा व्हावा, म्हणून काही वर्षांपूर्वी १७ कोटी खर्च करून खडखड येथील नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली, मात्र सात ते आठ वर्षे उलटूनही अजूनही शहरातील काही भागांत पाणी योजना प्रत्यक्षात अमलात आलेली नाही. कोट्यवधी खर्च करून छत्रपती शिवाजी महाराज उद्यान बांधण्यात आले, मात्र त्यात काही बेकायदा कामे आढळून आल्याने ते अद्यापही बंद आहे. यामुळे जव्हारकरांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे सुविधांच्या अभावाने शहर विकासाच्या स्पर्धेत मागे पडले आहे.
गेल्या अनेक निवडणुकांमध्ये आश्वासनांची खैरात वाटली गेली, पण परिस्थितीत फारसा बदल झालाच नाही. लोकप्रतिनिधी विकासाबाबत सजग असते, तर बदल झाला असता. आज शहराला दररोज शुद्ध पाणी मिळाले असते. सुसज्ज बाजारपेठ उभी राहिली असती आणि जव्हार ‘स्वच्छ व सुंदर शहर’ म्हणून ओळखले गेले असते, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
कुटुंबाप्रमाणे शहराचा विचार हवा!
सध्या निवडणुकीची धामधूम सुरू असून, उमेदवार प्रचाराला लागले आहेत. मतदारांना पुन्हा एकदा आश्वासनांची बरसात ऐकायला मिळत आहे. ‘आम्ही हे करू, ते करू!’, मात्र आजवरच्या निवडणुकांमध्ये अशा आश्वासनांवर विश्वास ठेवून सत्तेची चावी सोपवली, तरी जव्हार शहरातील ‘विकासाचा अंधार’ अजूनही कायम आहे. थोडक्यात, मतदारराजाच्या मते, शहरात शिक्षण, आरोग्य, चांगले रस्ते, स्वच्छ पाणी या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, म्हणून कुटुंबाप्रमाणे प्रयत्न केल्यास हे शक्य होईल. तीन डिसेंबरनंतर सत्तेत येणाऱ्यांनी शहरातील समस्यांकडे गांभीर्याने पाहून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात, अशी मागणी सर्वसामान्यांतून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.