मुंबई

बदलापूरमध्ये मतदान जनजागृती

CD

मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची प्रभातफेरी
मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांचा विशेष सहभाग
बदलापूर, ता. २६ (बातमीदार) ः कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या उपस्थितीत आदर्श विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी मंगळवारी (ता. २५) शहरात उत्साहपूर्ण प्रभातफेरी आणि पथनाट्य सादर करत मतदार जनजागृतीचा प्रभावी संदेश दिला. शहरातील महत्त्वाच्या चौक परिसरात घोषणाबाजी आणि माहितीपर फलकांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत मतदानाचे महत्त्व पोहोचवण्यात आले.

प्रभातफेरीनंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रभावी पथनाट्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधले. ‘प्रत्येक मत महत्त्वाचं’ हा केंद्रबिंदू ठेवून तयार केलेल्या या नाटकात निष्काळजी, पैशाचे राजकारण आणि मतदानाबाबतची उदासीनता यावर मार्मिक भाष्य करण्यात आले. समाजातील प्रत्येक घटकाने मतदानाचा हक्क जबाबदारीने पार पाडावा आणि लोकशाही प्रक्रियेचे मूल्य जपावे, असा प्रभावी संदेश या पथनाट्यातून देण्यात आला.

मुख्याधिकाऱ्यांचे कौतुक
स्वतः मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास पाहून त्यांचे कौतुक केले. भविष्यातील बदलापूर पालिकेचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठीचे हे पुढचे मतदार आहेत, असे म्हणत त्यांनी मतदारांना घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT