भाईंदर, ता. २६ (बातमीदार) : आजारी पशू व प्राण्यांना उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जाण्याची आता आवश्यकता नाही. त्यांच्यावर जागेवरच उपचार करता यावेत, यासाठी मिरा-भाईंदर महापालिकेने रुग्णवाहिका खरेदी केली आहे. महापालिका आयुक्तांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले. आजारी पशू व प्राण्यांना दवाखान्यात नेण्यासाठी अनेक अडचणी येत असतात. शिवाय, प्राण्यांवर उपचार करणाऱ्या दवाखान्यांची संख्याही शहरात कमी आहे. ही समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने रुग्णवाहिका तैनात केली आहे. ही रुग्णवाहिका मागविण्यासाठी ७२०८०७०८०६ हा विशिष्ट क्रमांकही ठेवण्यात आला आहे. घरगुती आजारी प्राण्यांसाठी किंवा रस्त्यावर आजारी आढळून आलेल्या प्राण्यांवर जागेवरच औषधोपचार करता यावेत, यासाठी या क्रमांकावर सकाळी १० ते सायंकाळी ५ यादरम्यान संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.