माजी नगरसेवकांमुळे चुरशीच्या लढती
अनुभवाच्या जोरावर पुन्हा निवडणूक रिंगणात उतरणार
जुईनगर, ता.२६ (बातमीदार): महापालिका निवडणुकीत २०१५ साली पराभूत अथवा आरक्षणाअभावी निवडणूक रिंगणातून बाहेर पडलेले नगरसेवक निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. दांडगा अनुभवाच्या जोरावर पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्याच्या राजकारणावर नाराजी व्यक्त करत पुन्हा जनहिताच्या मुद्द्यांवर माजी नगरसेवक निवडणुकाला सामोरे जाणार आहेत. स्वतःच्या हितासाठी पक्ष बदलणारे, पक्षनिष्ठा खुंटला टांगून जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या लोकांविरोधात निवडणूक असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे माजी नगरसेवक कोणत्या पक्षातून निवडणूक लढतील, याबाबतची उत्सुकता लागली आहे. राजकारणातील अस्थिरता, राज्यातील घडामोडींमुळे तीमन वेळा नगरसेवक पदाचा अनुभव असलेल्या विविध पक्षाच्या ज्येष्ठांकडून संपर्कावर भर दिला जात आहे. अनेकांना तर पक्षाकडून तिकिटाची निश्चित शाश्वती मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. तर काहींना संपूर्ण प्रभागाची जबाबदारी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काळात नवी मुंबईतील निवडणूक ज्येष्ठ नगरसेवकांच्या हातात जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
--------------------------
तगडे आव्हान
अनुभवी नगरसेवकांच्या रणनीतीचा फायदा घेत विविध राजकीय पक्ष विजयी उमेदवारांची संख्या वाढीवर काम करत आहेत. नवी मुंबईत चार ते पाच वेळा नगरसेवक पदी राहिलेले लोकप्रतिनिधी आहेत. काही लोक आरक्षणामुळे तर काही लोक आर्थिक गणिते फिरल्याने पराभूत झाले होते. पण आता प्रस्थापित असलेले नगरसेवक पुन्हा निवडणुकांना सामोरे जाणार असल्याने इच्छुक उमेदवारांपुढे तगडे आव्हान असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.