मुंबई

पेणमध्ये अनधिकृत हातगाड्यांचा सुळसुळाट

CD

पेणमध्ये अनधिकृत हातगाड्यांचा सुळसुळाट
वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांसह पादचारी त्रस्‍त
पेण, ता. २६ (वार्ताहर) : मुंबईपासून जवळच असलेल्या आणि रायगड जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या पेण शहरात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. या वाढत्या नागरीकरणासोबतच शहरातील अरुंद रस्ते आणि अपुरी सुविधा हा गंभीर प्रश्न बनला आहे. त्यातच अनधिकृत हातगाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अडथळे निर्माण होत आहेत.
विशेषतः शहरातील मुख्य रस्त्यांवरील फुटपाथ तसेच उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर हातगाड्या लावल्या जात असल्याने पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे. वृद्ध नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून चालावे लागत असल्याने अपघाताचाही धोका वाढला आहे. पेण हा व्यापारासाठी महत्त्वाचा केंद्रबिंदू असल्याने ग्रामीण भागातून तसेच अन्य तालुक्यांमधून मोठ्या प्रमाणावर नागरिक येथे खरेदी-विक्रीसाठी येतात. त्यामुळे बाजारपेठ नेहमीच गजबजलेली असते. परंतु अपुरे पार्किंग, अरुंद रस्ते आणि बेशिस्तपणे लावण्यात येणाऱ्या हातगाड्यांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. याबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी केल्या जात असून, नगरपालिका प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
..................
हातगाड्यांवर कारवाई होणार
यासंदर्भात पेण नगरपालिकेचे अतिक्रमण नियंत्रण विभागाचे अधिकारी महेश वडके यांनी सांगितले, की शहरातील मुख्य रस्ते, फुटपाथ तसेच रुग्णालय परिसरात अनधिकृतपणे उभ्या करण्यात आलेल्या हातगाड्यांवर निश्चितपणे कडक कारवाई केली जाईल. सध्या नगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेमुळे कारवाईला विलंब झाला असून, निवडणुका संपताच या अनधिकृत हातगाड्यांवर तत्काळ कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM KISAN 22nd Installment : महाराष्ट्रातील १.७० लाख शेतकऱ्यांना मोठा झटका, एका चुकीमुळे थांबला २००० रुपयांचा हप्ता; नेमकं काय घडलं ?

Leopard inside ZP School : बछड्यांना घेऊन बिबट्या आला शाळेच्या आवारात.., मुलं झाली भयभीत, 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

Mumbai: “तू खालच्या जातीचा…”; ब्रेकअपनंतर टोमणे; मुंबईत १७ वर्षीय विद्यार्थ्याने संपवलं जीवन, प्रेयसीवर SC-ST कायद्यांतर्गत गुन्हा

चूक नसतानाही प्राचार्यांकडून सर्वांसमोर पाईपने मारहाण, अपमान जिव्हारी; १९ वर्षीय विद्यार्थ्यानं संपवलं आयुष्य

Tom Bruce: सहसदस्य देश केवळ विश्वकरंडकापुरतेच मर्यादित; स्कॉटलंडच्या टॉम ब्रुसची खंत!

SCROLL FOR NEXT