मुंबई

अंबरनाथ मासळी बाजार पुन्हा सुरू

CD

अंबरनाथ, ता. २६ (वार्ताहर) : अंबरनाथ पूर्वेकडील सुमारे ४० वर्षे जुन्या मासळी बाजारावर ऑक्टोबरमध्ये केलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईचा परिणाम अल्पकाळच टिकला. बंद केलेला हा बाजार पुन्हा सुरू झाला आहे. अस्वच्छता आणि दुर्गंधीच्या तक्रारींनंतर पालिकेने या जागेला लोखंडी जाळी लावून बंद केले होते; मात्र विक्रेत्यांचा रोजगार हिरावल्याने मोठा विरोध निर्माण झाला आणि पुनर्वसनाच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.
पालिकेने ज्या ठिकाणी लोखंडी जाळ्या लावून दुकाने हटवली, त्याच जाळ्यांच्या पुढे रस्त्यावरच मासळी विक्रेत्यांनी पुन्हा व्यवसाय सुरू केला आहे. आधीच अरुंद असलेला हा रस्ता आता दुकाने, फड आणि ग्राहकांच्या गर्दीमुळे अधिकच गजबजला आहे. रस्त्याचा मोठा भाग व्यापला गेल्याने वाहतूक कोंडी वाढत आहे. सांडपाणी व कचऱ्यामुळे अस्वच्छताही वाढली आहे. पालिकेच्या कारवाईनंतरही विक्रेत्यांनी रस्त्यावर ठाण मांडले आहे. पर्यायी जागा न देता रोजगार हिरावला, हा त्यांचा आरोप अधिक ठळकपणे समोर आला आहे.

पुनर्वसनाची मागणी
दुसरीकडे, कारवाई केवळ कागदोपत्रीच राहिल्याचे स्पष्ट होत आहे. या बाजाराच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात पालिका पुन्हा अपयशी ठरल्याचे नागरिकांकडून बोलले जाते. या विक्रेत्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आणि परिसरातील वाहतूक व स्वच्छतेची समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. गेली ४० वर्षे आमचा उदरनिर्वाह सुरू असून पालिकेने आमचे पुनर्वसन करावे, अशी ठाम मागणी मासळी विक्रेते करत आहेत.


अंबरनाथ :

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT