विरार, ता. २६ (बातमीदार) : वसईच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती समाज पसरला असून त्यांचा सर्वात मोठा सण म्हणजे नाताळ. या सणाला महिना असला तरी चर्चसमोर नाताळ गोठा, ख्रिसमस ट्री, आकाश कंदील यांची दुकाने सजू लागली आहेत.
उत्तनपासून झाईपर्यंतच्या परिसरात ख्रिस्ती समाज मोठ्या प्रमाणात पसरला आहे. रविवारी (ता. ३०) नाताळची वर्दी देणारी पहिली मेणबत्ती चर्चमध्ये लागली जाणार आहे. दुसऱ्या बाजूला चर्चची रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नाताळच्या खरेदीलाही सुरुवात झाली आहे, तर घरामध्ये सणासाठी वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.
नाताळ सणासाठी विविध चर्चेबाहेर दुकाने लावण्यास सुरुवात झाली आहे. या दुकानांत ख्रिसमस ट्री, नाताळ बाबा, नाताळ गोठा, ४० प्रकारचे आकाश कंदील, म्युझिकल लाईट आणि पुतळे, त्याचप्रमाणे लहान मोठे रेनडिअर आणि इतर वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.
वसई परिसरामध्ये नाताळच्या जवळपास एक महिना अगोदर दुकाने लावली जात आहेत. दरवर्षीप्रमाणे वेगवेगळे नाताळ बाबा, संगीतावरील पुतळे आणण्यात आले आहेत. गेल्या वर्षीचेच दर यावेळीही ठेवण्यात आले आहेत.
- विलास घोंसलवीस, दुकानदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.