अंबिवली स्टेशनजवळ आक्षेपार्ह साहित्याचे वाटप
टिटवाळा, ता. २६ (वार्ताहर) : कसारा मार्गावरील आंबिवली रेल्वे स्थानकाच्या बाहेर धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तथाकथित संत रामपाल यांच्या अनुयायांनी उभारलेल्या स्टॉलवरून सनातन धर्मविरोधी आशयाची पुस्तके मोठ्या प्रमाणावर वाटप केल्याचे समोर आले आहे. हरियाणातील हिसार येथे अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी ठरलेले आणि सध्या जेलमध्ये असलेले रामपाल यांच्या विचारसरणीचे हे साहित्य असल्याचे सांगण्यात येत आहे.
स्टॉलवरील पुस्तकांमध्ये आक्षेपार्ह, अवमानकारक आणि भ्रमित करणारे मजकूर स्पष्टपणे छापलेले होते. यापैकी ‘अंध श्रद्धा भक्ति-खतरा-ए-जान’ नावाच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर कुंभमेळ्याचे छायाचित्र आणि साधूंचा फोटो वापरण्यात आला होता. या प्रकरणाची माहिती मिळताच विश्व हिंदू परिषद व बजरंग दल, कल्याण जिल्हा कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत स्टॉल बंद पाडला. संघटनांनी संबंधित साहित्य जप्त करून संपूर्ण प्रकरण खडकपाडा पोलिस चौकीत नोंदवले. पोलिसांकडे तक्रार दाखल करताना त्यांनी अशा प्रकारच्या साहित्यामुळे सामाजिक वैमनस्य निर्माण होऊ शकते आणि शांतता भंग होण्याची शक्यता असल्याचा मुद्दा मांडला. तक्रारीची नोंद घेत पोलिसांनी वितरित करण्यात आलेल्या सर्व पुस्तकांच्या प्रती चौकीत जमा करून पुढील कारवाईचे आश्वासन दिले. साहित्याचे परीक्षण करून आवश्यक ते कायदेशीर पावले उचलली जातील, असे पोलिसांनी संघटनांना कळवले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.