मुंबई

ढगाळ वातावरणामुळे आंबा बागायतदार चिंताग्रस्त

CD

बोर्डी, ता. २६ (बातमीदार) : ढगाळ वातावरणामुळे आंबा बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील दोन हंगामात आंबा बागायतीमधून उत्पादन घटल्यामुळे बागायतदार अगोदरच चिंतेत असताना गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे समस्येमध्ये आणखीनच वाढ झाली आहे.

डहाणू आणि तलासरी तालुक्यात सुमारे चार हजार हेक्टर जमिनीवर केसर व हापूस आंबा बागायत रुजवली आहे. याव्यतिरिक्त नैसर्गिकरित्या शेताच्या बांधावर व डोंगर माथ्यावर मोठ्या प्रमाणात देशी आंब्याची झाडे दिसून येतात. आंब्याच्या फळांना कॅनिंगसाठी मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आता पर्याय म्हणून आंबा पिकाला प्राधान्य दिले आहे. अनेक बागायतदार चिकूच्या बागा कापून आंब्याची कलमे लावत आहेत, मात्र २०२४-२५ या हंगामात आंब्याच्या झाडापासून उत्पन्न मिळालेले नाही. दोन वर्षे वाया गेल्यामुळे बागायतदार हवालदिल आहे, तरीसुद्धा चालू वर्षी उशिरापर्यंत पाऊस पडल्यामुळे थोडा फार प्रमाणात उत्पादन हाती येईल, या आशेने बागायतदारांनी आंब्याच्या झाडांवर फवारणी, तसेच मशागत व खत देण्यास सुरुवात केली आहे.

शेतकऱ्यांनी उदासीन परिस्थितीतही उत्साह दाखवून कामाला सुरुवात केली असली तरी निसर्ग मात्र शेतकऱ्याची परीक्षा पाहत आहे. सोमवार (ता. २४) पासून या संपूर्ण भागामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मोहोर येण्याच्या प्रक्रियेमध्ये बाधा येईल, असा भीती बागायतदार व्यक्त करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Latest Crime : इचलकरंजीच्या तारदाळमधील दर्गा चौकात राजकीय वाद उफाळला, थेट चाकूने छाती, पोटावर वार केले अन्

Chef Kunal Kapoor: डाएट करताय पण तेच ते बेचव खाऊन कंटाळा आलाय? मग शेफ कुणाल कपूरची फायबर रिच मिलेट खिचडी आजच ट्राय करा

Income Tax Rules: पतीचे पैसे, पत्नीच्या नावावर SIP! मग टॅक्स कोण भरणार आणि किती लागेल? जाणून घ्या आयकर नियम सोप्या भाषेत

लग्नानंतर 15 दिवसांतच अभिनेत्याने आई आणि बायकोला घरात कोंडलं; "एकटं राहण्याची सवय.."

ESMA Act : भारत सरकारने गॅस तुटवड्यामुळे लागू केला एस्मा कायदा, LPG वितरणावर राहणार नियंत्रण, साठेबाजांची खैर नाही

SCROLL FOR NEXT