वाडा, ता. २७ (बातमीदार) : नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रचाराने आता वेग पकडला आहे. एकंदरीत काही प्रभागांत तिरंगी, तर काही ठिकाणी चौरंगी लढती होणार असून त्या अटीतटीच्या व रंगतदार होणार आहेत. प्रभाग क्रमांक १७ मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून माजी उपनगराध्यक्षा वर्षा गोळे, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून माजी उपनगराध्यक्षा सुचिता पाटील, भाजपकडून सुप्रिया पाटील, शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून वंदना सुतार या निवडणूक लढवित आहेत. या प्रभागात चौरंगी लढत होणार असून कोण यात गुलाल उधळतो, याकडे तमाम वाडेकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
प्रभाग क्रमांक १७ मध्ये कुणबी आणि आगरी समाजाचे प्रत्येकी दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत शिक्षित मतदार हे विकास करणाऱ्या प्राधान्य देतील, असे मतदारांचे म्हणणे आहे. सर्व स्थानिक उमेदवार असल्याने प्रभागातील निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. वर्षा गोळे आणि सुचिता पाटील या दोघींनीही पाच वर्षांच्या कालावधीत उपनगराध्यक्षपद सांभाळले असून प्रभागात त्यांनी चांगली कामे केली आहेत. त्यामुळे या प्रभागात मोठी चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे कोण कोणाला चितपट करतो, हे ३ डिसेंबरला दिसून येईल.
प्रभाग क्रमांक ५ मध्येही चौरंगी
प्रभाग क्रमांक ५ मधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आदेश डेंगाणे, भाजपकडून तेजस पाटील, ठाकरे गटाकडून संतोष रसाळकर, शिंदे गटाकडून राजकिरण पाटील निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. येथे चौरंगी लढत होणार असून कोण कोणाला धूळ चारतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
काँटे की टक्कर
प्रभाग क्रमांक १० मध्ये चौरंगी लढत होणार असून मनिष देहेरकर (भाजप), निखील पाटील (राष्ट्रवादी अजित पवार गट), संदीप गणोरे (शिवसेना एकनाथ शिंदे गट), तर काँग्रेसकडून गोपाळ आगिवले हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. गणोरे यांनी काही काळ उपनगराध्यक्ष पदाची धुरा सांभाळली आहे. देहेरकर हेही माजी नगरसेवक असून शहराचा त्यांना दांडगा अभ्यास आहे. पाटील आणि आगिवले हे पहिल्यांदा निवडणूक लढवित असून काटे की टक्कर पहावयास मिळणार आहे.
या प्रभागांमध्ये तिहेरी लढत
प्रभाग उमेदवार
३ स्मिता पातकर (भाजप), प्रिती गंधे (ठाकरे गट), सुगंधा भानुशाली (शिंदे गट)
८ हरेश कोकाटे (भाजप), चेतन कोलेकर (ठाकरे गट), उमेश लोखंडे (शिंदे गट)
१२ भारती सपाटे (काँग्रेस), प्रमोद पठारे (भाजप), प्रफुल पाटील (राष्ट्रवादी अजित पवार गट)
१४ रिता थोरात (भाजप), रेश्मा गायकवाड (ठाकरे गट), वणिता थोरात (शिंदे गट)
१५ प्रगती वलटे (भाजप), गिता भोईर (काँग्रेस), विशाखा पाटील (शिंदे गट)
१६ युवराज ठाकरे (ठाकरे गट), अजिंक्य पाटील (शिंदे गट), प्रथमेश गोरे (भाजप)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.