३१ पोलिस ठाण्यांचा बहुमान
आंतरराष्ट्रीय निकषांमुळे आयएसओ मानांकन
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २७ ः शहरातील गुणवत्तपूर्ण, पारदर्शक आणि आंतरराष्ट्रीय निकषांची पूर्तता करणाऱ्या ३१ पोलिस ठाण्यांना आयएसओ मानांकन दर्जा देण्यात आला आहे. यामध्ये चार विभागीय सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यालयांसह अधिनस्त २२ पोलिस ठाण्यांचा समावेश करण्यात आला आहे.
वाढत्या नागरीकरणाबरोबर गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. याच अनुषंगाने नवी मुंबई पोलिसांनी विशेष उपाययोजना राबवल्या होत्या. तसेच नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध सेवांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेवांचा गुणवत्तापूर्वक समावेश आहे. नागरिकांमध्ये विश्वासार्ह्यता निर्माण करणे, पोलिस ठाणे, शाखांमधील कामकाज वेळेत करणे, प्रत्येक कामासाठी निश्चित अशी मानक प्रणाली तयार काटेकोरपणे राबवणे, सर्व कामकाज पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने पार पडणे, अशा निकषांची पूर्तता करणाऱ्या पोलिस ठाण्यांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्र दिले आहे.
-----------------------------------
घोषित मानांकने
वाशी - वाशी, एपीएमसी, रबाळे, कोपरखैरणे, रबाळे एमआयडीसी
तुर्भे - तुर्भे एमआयडीसी, नेरूळ, एनआरआय सागरी, सीबीडी-बेलापूर, सानपाडा
पनवेल - खारघर, तळोजा, कळंबोली, खांदेश्वर, कामोठे, पनवेल शहर, पनवेल तालुका
उरण - उरण, न्हावा-शेवा, मोरा सागरी, उलवे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.