मुंबई

मतदारयादीच्या हरकतींसाठी मुदतवाढ द्या

CD

मतदार यादीतील घोळामुळे हरकतींना मुदतवाढ द्या!
नरेंद्र पवार यांची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी
कल्याण, ता. २६ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीत प्रचंड गोंधळ आणि अनेक चुका असल्याचा गंभीर आक्षेप कल्याण पश्चिमेकडील भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी घेतला आहे. या चुका दुरुस्त करण्यासाठी नागरिकांना पुरेसा वेळ मिळावा, यासाठी त्यांनी यादीवरील हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी तब्बल १० दिवसांची अतिरिक्त मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.
माजी आमदार नरेंद्र पवार यांनी थेट राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे. पत्राची प्रत त्यांनी केडीएमसी आयुक्त आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाही पाठवली आहे. केडीएमसी निवडणूक विभागाने गेल्या आठवड्यात २० नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली. या यादीवर हरकती आणि सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख २७ नोव्हेंबर आहे. हा कालावधी अत्यंत कमी असल्याने नागरिकांना योग्य माहिती आणि पुरावे सादर करण्यात अडचणी येत असल्याचे पवार यांनी पत्रात नमूद केले आहे. मतदार यादीतील चुकांच्या पार्श्वभूमीवर हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी किमान १० दिवसांची मुदतवाढ तातडीने देण्यात यावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT