काँग्रेसच जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
कल्याण-डोंबिवलीत प्रमुख पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २६ ः महापालिका निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. बुधवारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक सचिन पोटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तसेच त्यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांनीही पक्षातील पदांचे सामूहिक राजीनामे दिले.
काँग्रेसच्या संघटनात्मक रचनेत निर्माण झालेली पोकळी आणि शहरातील राजकीय समीकरणे नव्याने आखली जाण्याची शक्यता आहे. यामुळे विरोधी पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसची नवीन संघटन रचना पुढील काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे.
नाराजीचा निर्णय नाही
पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार हा राजीनामा दिला आहे. नव्या पदाधिकाऱ्यांना संधी मिळावी म्हणून मी पद सोडत असून, हा नाराजीचा निर्णय नाही, असे सचिन पोटे यांनी स्पष्ट केले. त्यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, हर्षवर्धन सपकाळ आणि संजय दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील वाटचाल सुरूच राहील, असेही अधोरेखित केले.
दरम्यान, कल्याणमध्ये चर्चेला उधाण आले आहे. सचिन पोटे लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपाकडून ही ऑफर मिळाल्याची चर्चा आहे. सचिन पोटे यांनी मात्र आपण कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
राजीनामा दिलेले पदाधिकारी
सचिन पोटे - जिल्हाध्यक्ष
लिओ मॅकेनराय - उपाध्यक्ष
विमल ठक्कर - ब्लॉक अध्यक्ष
शकील खान - ब्लॉक अध्यक्ष
प्रवीण साळवी - ब्लॉक अध्यक्ष
मनीषा सर्जिने - ब्लॉक अध्यक्ष, कल्याण पूर्व
अशोक कापडणे - ब्लॉक अध्यक्ष
सचिन भटेवरा - ब्लॉक अध्यक्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.