मुंबई

ठाण्यात चंपाषष्ठी उत्सव उत्साहात संपन्न

CD

ठाण्यात चंपाषष्ठी उत्सव उत्साहात
स्वयंभू खंडोबा मंदिरात भाविकांची अभूतपूर्व गर्दी
ठाणे, ता. २६ (बातमीदार): मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी चंपाषष्ठी म्हणून साजरी केली जाते. चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाचे दर्शन घेतले जाते. यासाठी ठाण्यातील प्रसिद्ध अशा स्वयंभू खंडोबा मंदिरात भाविकांनी सकाळपासून मोठी गर्दी केली होती. चंपाषष्ठीच्या दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन मणी आणि मल्ल दैत्यांचा वध केला.
जय मल्हार मंदिर ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेला चंपाषष्ठी उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात झाला. दिवसभरातील विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांना ठाणे शहरासह आसपासच्या भागातून आलेल्या भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उत्सवाची सुरुवात पहाटे ५ ते ७ या वेळेत श्री खंडोबा देवाच्या अभिषेक व पूजाविधीने झाली. सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची गर्दी दिसत होती. दुपारी दोन वाजता विटावा येथील श्री विठ्ठल कृपा भजनी मंडळाची भजनसंध्या आणि भजनसम्राट शंकर महाराज उतेकर यांचा कार्यक्रम यामुळे परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. यानंतर सायंकाळी ५.३० वाजता श्री खंडोबा महाराजांची महाआरती पार पडली. त्यानंतर रात्री ६ ते १० या वेळेत भाविकांसाठी भंडारा (महाप्रसाद) आयोजित करण्यात आला होता. मोठ्या संख्येने भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. उत्सवाचा शेवट रात्री १० वाजता झालेल्या जागरण व गोंधळ कार्यक्रमाने झाला.
पुणे जिल्ह्यातील बेल्हा येथील शाहीर चंद्रकांत शिंदे आणि पार्टी यांच्या वाघ्या-मुरळीच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला शिखर क्षण प्राप्त झाले आणि उपस्थितांनीदेखील त्याला उत्स्फूर्त दाद दिली. उत्सवाचे आयोजन यशस्वीपणे पार पडण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप शिवले, उपाध्यक्ष संतोष नन्हे, सचिव सर्जेराव नन्हे, सहसचिव अंकुश पिंगळे, खजिनदार रोहिदास वायकर, उपखजिनदार रवींद्र पाटील तसेच संचालक व सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. दरम्यान, हा उत्सव अत्यंत शांततेत आणि भक्तिमय वातावरणात पार पडल्याची माहिती आयोजकांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup : अहमदाबाद में जितना जरूरी था, आपको तो पता ही हैं! सूर्यकुमार यादव मुंबईत येताच काय म्हणाला बघा Video Viral

Mumbai Weather: कोकण-मुंबई पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट, वातावरण कसं राहणार? हवामान तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Umarga Accident : हॉटेलमध्ये कार घूसल्याने दोघांचा मृत्यू; दोघे गंभीर जखमी, उमरगा शहराजवळ झाला अपघात

मुंबईला ये... नाना पाटेकरांमुळे इंडस्ट्रीमध्ये आले मकरंद अनासपुरे; जुनी आठवण सांगत म्हणाले- त्या दिवशी...

Suryakumar Yadav: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी MS Dhoni ला कॉल; सूर्याने सांगितला, 'कॅप्टन कूल'चा सल्ला कसा कामी आला

SCROLL FOR NEXT