मुंबई

जांभूळ ग्रामपंचायतीत संविधानाचा नारा;

CD

जांभूळ ग्रामपंचायतीत संविधानाचा नारा
कल्याण तालुक्यात उत्साहात संविधान दिन साजरा
टिटवाळा, ता. २६ (वार्ताहर) : संविधान दिनानिमित्त कल्याण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती, शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांत भारतीय संविधानाप्रती निष्ठा व्यक्त करण्यासाठी ‘कॉन्स्टिट्यूशन कनेक्ट’ अभियान राबविण्यात आले. तालुक्यातील जांभूळ ग्रामपंचायतीने मात्र दिवसाची सुरुवात प्रभातफेरीने करून गावागावात संविधानाच्या घोषणा देत उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
सरपंच परिक्षित पिसाळ यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर जांभूळ येथील जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांनी संविधान दिनाच्या घोषणा देत संपूर्ण गावातून प्रभातफेरी काढली. ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होत संवेदनशीलता अधोरेखित केली.
संविधान चौकात सर्वांनी एकत्र येऊन संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. पुढे ग्रामपंचायत सभागृहात ग्रामस्थ आणि महिलांच्या उपस्थितीत ‘कॉन्स्टिट्यूशन कनेक्ट’ या अभियानाचे लाइव्ह प्रक्षेपण करण्यात आले. या कार्यक्रमाला सरपंच पिसाळ, उपसरपंच अक्षय सावंत, सदस्य रेखा गायकवाड, ग्रामपंचायत अधिकारी अश्विनी यशवंतराव, माजी सरपंच अर्चना राणे, सीआरपी दीपाली तुपे, मुख्याध्यापक कोमलसिंग सोळंके, शिक्षिका सुनीता फुलसुंदे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते. विविध शैक्षणिक व जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती ग्रामपंचायत अधिकारी यशवंतराव व उपसरपंच सावंत यांनी दिली.

पंचायत समितीतही संविधान दिन उत्साहात
कल्याण पंचायत समितीतही संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रभारी गटविकास अधिकारी रघुनाथ गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अनिल धांडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन केले. सर्व अधिकारी व कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. गोवेली ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपाली मेश्राम यांनी आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संविधान दिन साजरा केला.
तालुक्यातील प्रत्येक स्तरावर विविध उपक्रम व जनजागृती कार्यक्रमांद्वारे संविधान दिन साजरा होत असल्याने कल्याण तालुका संविधानाच्या मूल्यांनी भारावून गेला, अशीच भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT