रंग कारखाना खाक
खालापूर, ता. २६ (बातमीदार) ः कराडे (बुद्रुक) गावाजवळ रंग तयार करणाऱ्या सुप्रिया केमिकल्स कारखान्याला दुपारी आग लागली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी पाणी आणि फोमचा मारा करीत तीन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. परंतु कारखाना खाक झाला. कारखान्यातील दोन कामगारांनी समयसूचकता दाखवत पळ काढल्याने जीवितहानी टळली. आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात पसरल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
आंदोलनाच्या तयारीत
कराडे बुद्रुक गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रासायनिक कारखान्यात नेहमीच दुर्घटना घडत असतात. वर्षभरात आगीच्या दोन घटना, स्फोटाची एक घटना घडली होती. तसेच वायुगळतीचे प्रकार नेहमी घडत असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. दोन हजारच्या आसपास लोकवस्ती असून, या घटनेमुळे नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. अशा कारखान्यावर कारवाईसाठी आंदोलनाच्या तयारीत आहेत.
---
फोटो - सुप्रिया केमिकल्स कारखान्यात लागलेली आग.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.