मुंबई

शिवसेनेच्या अभियानाची मुंबईतून सुरुवात

CD

‘शाखा तिथे संविधान’ शिवसेनेचे अभियान सुरू

मुंबई, ता. २६ ः शिवसेनेच्या ‘शाखा तिथे संविधान’ या अभियानाची सुरुवात मुंबईतून करण्यात आली. विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थिती संविधानाची प्रास्ताविका व उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून अभियान सुरू करण्यात आले.
याअंतर्गत राज्यातील प्रत्येक शिवसेना शाखांत संविधानाची प्रास्ताविका व प्रत ठेवून सांविधानिक मूल्यांचा व्यापक प्रसार केला जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून ही मोहीम राबवली जात आहे. या अभियानांतर्गत संविधान बाग, संविधान संग्रहालय उभारणे, देशभरातील सर्व रेल्वे स्थानकांवर व विमानतळावर संविधानाची प्रास्ताविका प्रदर्शित करणे, तसेच संविधानासाठी कार्यरत व्यक्ती व संस्थांचा सत्कार आयोजित करणे, यांसारखे उपक्रम राबविण्यात येणार आहे, असे अभियानाचे प्रमुख संयोजक किरण सोनावणे यांनी सांगितले. या अभियानात लोककलावंत सहभागी होणार आहेत. याप्रसंगी शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना प्रवक्ते व मुख्य संयोजक किरण सोनावणे, माजी आमदार राम पंडागळे आदी उपस्थित होते.
...
शिवसेना संविधाननिष्ठ पक्ष!
भारतीय संविधान हे समानता, स्वातंत्र्य, न्याय आणि संधी यांची हमी देणारे महान दस्तऐवज आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही एकदा स्पष्ट शब्दांत सांगितले होते, की न्यायालयात शपथ घ्यायची असेल तर ती संविधानावर हात ठेवूनच घेतली पाहिजे. ‘शाखा तिथे संविधान’ या उपक्रमामुळे शिवसेना संविधाननिष्ठ पक्ष आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित होईल, असे शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे याप्रसंगी म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur ZP Election : कोल्हापूर झेडपीत मुश्रीफ सांगतील तेच, अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला तर भाजपकडून महाडिकांच्या विश्वासू शिलेदाराची निवड

अरे वाह! 'पारु' मालिकेनंतर प्रसाद जवादेला मिळाली नवी मालिका, पूर्वा कौशिकसोबत नवी जोडी, प्रोमो Viral

Latest Marathi News Live Update : माहिममधील सेंट झेवियर्स कॉलेज बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Suryakumar Yadav: कसोटीबाबत तळमळ; पण... टी-२० स्पेशालिस्ट सूर्यकुमार यादवचे पारंपरिक क्रिकेटबाबत मत

Shri Guru Paduka Darshan Mahotsav : श्रीगुरू पादुका दर्शन महोत्सवाची उत्कंठा,स्वामी स्वरूपानंदांच्या हस्ते शनिवारी उद्‍घाटन, गुरू श्री एम यांचे रविवारी व्याख्यान

SCROLL FOR NEXT