मुंबई

ठाणे पालिकेच्या संकेतस्थळावर नवी मुंबईच्या मतदार याद्या

CD

ठाण्यात नवी मुंबईच्या मतदार याद्या
पालिकेच्या संकेतस्थळावरील प्रकारामुळे मनसेचा संताप
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : ठाणे महापालिकेच्या मतदार याद्यांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. यासंदर्भात पालिका मुख्यालयात आंदोलन छेडले होते. याच पार्श्वभूमीवर मनसेने बुधवारी धक्कादायक पुरावे सादर करीत ठाणे महापालिकेच्या संकेतस्थळावर नवी मुंबई महापालिकेच्या मतदार याद्या अपलोड झाल्याचे उघड केले. या चुकांबाबत समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यास निवडणुका नीट होऊ देणार नाही, असा इशाराही मनसेच्या नेत्यांनी दिला.
ठाणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचना आणि आरक्षण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. मतदार याद्यादेखील जाहीर झाल्या आहेत. मात्र या याद्यांमध्ये मोठा घोळ असल्याचा मुद्दा मनसेने सातत्याने उपस्थित केला आहे. शनिवारी मनसे नेते अविनाथ जाधव यांनी कार्यकर्त्यांसह निवडणूक विभागात धडक दिली होती; पण अधिकारी अनुपस्थित असल्याने त्यांनी सोमवारी पुन्हा पालिका मुख्यालयात घेराव टाकला. मतदार यादीतील त्रुटींवर समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा आरोप करीत जाधव यांनी अधिकाऱ्यांसमोरच मतदार याद्या उधळून तीव्र निषेध नोंदवला.
…………….
निवडणुकीची थट्टा
ठाणे महापालिकेच्या संकेतस्थळावर आयुक्तांचे छायाचित्र झळकते आणि त्याच खाली नवी मुंबई शहरातील मतदार याद्या दिसतात. हे निवडणुकीची थट्टा आहे. ठाणे पालिकेने निवडणूक प्रक्रियेचा अक्षरशः खेळखंडोबा केला आहे. त्यांनी आयुक्त सौरभ राव यांच्याकडून योग्य उत्तरांची मागणी केली अन्यथा निवडणुका शांततेत होऊ देणार नाही, असा कडक इशारा दिला.
..
ठेकेदाराकडून तांत्रिक चूक - पालिका
संकेतस्थळ तयार करण्याचे काम एका खासगी ठेकेदाराकडे देण्यात आले आहे. निवडणुकांसाठी स्वतंत्र संकेतस्थळ तयार केले जात असताना, चाचणीदरम्यान ‘डमी वेबसाइट’वर नवी मुंबईच्या मतदार याद्या अपलोड झाल्याची कबुली ठेकेदाराने दिल्याचे ठाणे पालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी यांनी सांगितले. या दुर्लक्षाबद्दल संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली जाणार असून, दंडात्मक कारवाईही केली जाईल, असे बिरारी यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: सुप्रीम कोर्टात अचानक तणाव; सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले... तरुण वकिलाने नेमकं काय केलं?

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! महाराष्ट्रात आज 1 तोळा सोन्याचा दर किती? पाहा ताजे भाव

‘शाका लाका बूम बूम’मधला संजू झाला बाबा; सोशल मीडियावर केली 'खास' पोस्ट, नेटकरी म्हणाले...'छोटा संजू आता पुन्हा...'

Latest Marathi News Live Update : आखाती तणावाचा परिणाम; हॉटेल व्यवसायिकांना गॅस सिलेंडरचा तुटवडा

Pune News: मतदारांना धमक्या! मतपत्रिका कोरी द्या, अन्यथा नोकरीला मुकाल; ‘मसाप’साठी आमदार, नगरसेवकही सक्रिय..

SCROLL FOR NEXT