मुंबई

औषध संशोधन केंद्र उभारणार

CD

औषध संशोधन केंद्र उभारणार
मंत्री नरहरी झिरवाळ यांची माहिती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ ः आरोग्य विज्ञानासाठी जैवतंत्रज्ञान महत्त्वपूर्ण ठरत असून औषध क्षेत्रातील नावीन्यपूर्ण संशोधन आणि विकासासाठी (लाइफ सायन्सेस इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर) सुविधांयुक्त केंद्र उभारण्यात येणार आहे. असे इनोव्‍हेशन पार्क ही काळाची गरज आहे. त्यामुळे महाराष्ट्र नावीन्यपूर्ण औषधनिर्मिती क्षेत्रात आघाडीवर राहील, असे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.

अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. २५) बैठक झाली. या बैठकीस अन्न व औषध प्रशासन विभागातील सहआयुक्त (दक्षता) डॉ. राहुल खाडे, सहआयुक्त (औषधे) दा. रा. गहाणे, गिरीश हुकरे, व्ही. टी. जाधव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले, ‘देशातील गुजरात, आंध्र प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या ठिकाणी संशोधन केंद्र उभी राहत असून औषधांसंदर्भात जैविक व रासायनिक संशोधनासाठी फॉर्म्युलेशन लॅबची सार्वजनिक-खासगी भागीदारीतून उभारणी केली जात आहे. या केंद्राचे मुख्य उद्दिष्ट औषधनिर्माण, बायोटेक, मेडिकल उपकरणे, डायग्नोस्टिक्स आणि डिजिटल हेल्थ क्षेत्रांतील नावीन्यपूर्ण स्टार्टअप्सना आधुनिक सुविधा, तांत्रिक मार्गदर्शन तसेच निधी उपलब्ध करून देणे आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Vidhan Bhavan Bomb Threat: विधानभवनात बॉम्बची धमकी! ई-मेलनंतर मुंबईत खळबळ; पोलिस-बॉम्ब स्क्वॉडची धावपळ, मोठी शोधमोहीम सुरू

Latest Marathi News Live Update : पुढील दोन दिवस उन्हाचा कडका, विदर्भासह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत तापमान 40 पार जाण्याची शक्यता!

LPG Cylinder Price Hike : गॅस संकट गडद, जाणून घ्या तुमच्या शहरात आज किती आहे LPG सिलिंडरचा दर ?

शुभमंगल सावधान! इशा डेचं धुमधडाक्यात लग्न, सोशल मीडियावर फोटो VIRAL

LPG Gas Crisis: पंधरा दिवस युद्ध चालल्यास गॅस संकट गडद; इंधन दरवाढीसह आयातीवर परिणाम साठेबाजी रोखण्याचे आव्हान

SCROLL FOR NEXT