मुंबई

अडीच कोटींच्या घंटागाड्या भंगारात!

CD

अडीच कोटींच्या घंटागाड्या भंगारात!
बदलापूर नगर परिषदेचा गलथान कारभार
बदलापूर, ता. २७ (बातमीदार) : कुळगाव बदलापूर नगर परिषद क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन नियमावलीची सर्रास पायमल्ली होत असून, सुमारे अडीच कोटी रुपये खर्चून खरेदी केलेल्या ४२ घंटागाड्या अवघ्या सात वर्षांत भंगारात काढण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे. या गंभीर प्रकारामुळे नागरिकांचा पैसा बुडीत गेल्याचा संताप व्यक्त होत आहे.

२०१६च्या घनकचरा व्यवस्थापन नियमावलीनुसार, कचरा संकलनानंतर बंदिस्त वाहनातूनच त्याची वाहतूक करणे बंधनकारक आहे; मात्र बदलापुरात अनेक भागांत उघडी, गंजलेली किंवा तात्पुरती वापरात आणलेली अन्य वाहने कचरा घेऊन फिरताना दिसत आहेत. या खुल्या वाहनांमधून कचऱ्याचे पाणी रस्त्यावर सांडत असल्याने दुर्गंधी, माशा-डास आणि अस्वच्छता पसरत आहे. रस्त्यावर कचरा पडल्याचे प्रकारही घडत असल्याने संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे.

ओला आणि सुका कचरा नागरिक स्वतंत्रपणे वर्गीकरण करून देत असतानाही प्रशासनाने नियम पाळला नाही, तसेच चांगल्या गाड्या भंगारात निघाल्याने नागरिकांचा पैसा व्यर्थ गेला, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. २०१८ मधील प्रकल्प अहवालानुसार बदलापूर शहराला ४२ घंटागाड्यांची गरज होती. यासाठी अडीच कोटी रुपयांहून अधिक निधी वापरून प्रति वाहन सुमारे पाच लाख ८६ हजार रुपये खर्च करून या गाड्या खरेदी केल्या गेल्या होत्या. या गाड्या कालांतराने वापराअभावी विविध ठिकाणी धूळ खात उभ्या राहिल्या. कचरा वाहतुकीसाठी प्रत्यक्षात इतरच गाड्यांचा वापर केला गेला.

बुडीत गुंतवणूक
परिणामी, अवघ्या सात वर्षांत या गाड्यांची भंगारात विक्री करण्याचा निर्णय नगर परिषद प्रशासनाला घ्यावा लागला. इतक्या मोठ्या निधीचा वापर होऊनही व्यवस्थापनात सुधारणा न होणे, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करत आहे.

आरोग्य विभागाची प्रतिक्रिया
बदलापूर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी श्रेया शिरवटकर यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता, त्यांनी खालील माहिती दिली, की २०१८-१९ मध्ये घेतलेल्या पालिकेच्या घंटागाड्या वापरून नादुरुस्त झाल्या होत्या, त्यामुळे ४२ पैकी ३० गाड्या भंगारात काढण्यात आल्या. सध्या रस्त्यावरून फिरणाऱ्या गाड्यांचा दर्जा तपासून लवकरच कचऱ्याचे नवीन निविदा काढण्यात येईल. कचरा वाहतुकीसाठी चांगल्या दर्जाच्या गाड्या वापरण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुणेकर झाले पोलिस! ४० लाख नागरिकांनी कमावून दिले १२ कोटी; ‘पीटीपी’ला राष्ट्रीय पुरस्कार

Pune Fraud News : बांधकाम व्यावसायिक महिलेची पावणेसहा कोटींची फसवणूक; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : माढा तालुका पंचायत समितीवर भाजप आणि अजित पवार गटाची सत्ता

Kirit Somaiya : बांगलादेशींना शोधण्यासाठी तीन वर्षातील जन्मदाखले तपासा; किरीट सोमय्या यांनी घेतली महापालिकेत बैठक

Naresh Mhaske : सुज्ञ जनतेने काँग्रेस आणि आघाडीला धुळ चारली; नरेश म्हस्के यांचे विरोधकांवर टीकास्त्र

SCROLL FOR NEXT