मुंबई

शिवसेना-काँग्रेस उमेदवारांमध्ये हाणामारी

CD

शिवसेना-काँग्रेस उमेदवारांमध्ये हाणामारी
अंबरनाथमध्ये राजकीय वातावरण तापले
बदलापूर, ता. २७ (बातमीदार) : अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, न्यू कॉलनी परिसरात शिवसेना (शिंदे गट) आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये थेट हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.

शिवसेना (शिंदे गट) उमेदवार आणि माजी नगरसेवक सुनील सोनी आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक उमेदवार मिलिंद पाटील या दोघांची निवडणूक प्रचार कार्यालये एकमेकांच्या शेजारी होती. काँग्रेस उमेदवाराच्या कार्यालयाच्या परवानगीवरून वाद सुरू झाला, ज्याचे रूपांतर हाणामारीत झाले. पालिकेचे कर्मचारी पाटील यांच्या अवैध मंडपावर कारवाई करण्यासाठी आले असता वादाला तोंड फुटले, असे सांगण्यात येत आहे.हाणामारीच्या घटनेत शिवसेना उमेदवार सुनील सोनी जखमी झाले आहेत. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी दोन्ही उमेदवारांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. तसेच दोघांच्याही प्रचार कार्यालयांची परवानगी रद्द करण्यात आली आहे.

उमेदवारांचे आरोप-प्रत्यारोप
सुनील सोनी (शिंदे गट) यांनी "मी दूर उभा असताना माझ्यावर पेव्हर ब्लॉक फेकण्यात आला," असा आरोप त्यांनी केला आहे. तर काँग्रेसचे मिलिंद पाटील यांनी मी फक्त स्वतःचा बचाव करत होतो, असे प्रतिपादन त्यांनी केले. या हाणामारीच्या प्रकरणामुळे स्थानिक निवडणुकीतील तणाव अधिक वाढला असून मतदारांमध्येही या घटनेची मोठी चर्चा रंगली आहे. निवडणुकीचा उर्वरित कालावधी शांततेत पार पडावा, यासाठी पोलिसांनी अधिक दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav: कसोटीबाबत तळमळ; पण... टी-२० स्पेशालिस्ट सूर्यकुमार यादवचे पारंपरिक क्रिकेटबाबत मत

Shri Guru Paduka Darshan Mahotsav : श्रीगुरू पादुका दर्शन महोत्सवाची उत्कंठा,स्वामी स्वरूपानंदांच्या हस्ते शनिवारी उद्‍घाटन, गुरू श्री एम यांचे रविवारी व्याख्यान

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरातील बिंदू चौकात गॅस गळतीमुळे आग

नाटक सुरु असताना अस्ताद काळे प्रेक्षकावर का भडकला? नाटक मध्येच थांबवून चांगलंच सुनावलं

IPS Sandeep Karnik : नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, नेमकं प्रकरण काय? २०१९ मध्ये काय घडलं होतं?

SCROLL FOR NEXT