मुंबई

विकासाची ''कॉपी-पेस्ट'' राजनीति

CD

विकासाची ‘कॉपी-पेस्ट’ राजनीती
राजेंद्र घोरपडे यांचा शिंदे गटावर घणाघात
बदलापूर, ता. २७ (बातमीदार) ः बदलापूर नगर परिषदेच्या तोंडावर निवडणुकीची हवा तापली असताना, माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी शिंदे गटावर थेट टीकेचा बाण सोडला आहे. आपल्या प्रभागातील विकासकामांची ‘कॉपी-पेस्ट’ केल्याचा आरोप करत त्यांनी राजकीय वातावरण आणखी तापवले आहे.

संविधान स्वीकृत दिनाच्या कार्यक्रमात बोलताना राजेंद्र घोरपडे यांनी आपल्या हेंद्रेपाडा प्रभागात केलेल्या आर्ट गॅलरी, उद्याने, व्यायामशाळा, स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासिका यांसारख्या विकासकामांची शहरातील अनेक नेत्यांनी ‘कॉपी-पेस्ट’ केल्याचा आरोप केला. मी केलेल्या कामांचे रोल मॉडेल ठेवून इतर प्रभागात कामे सुरू केली आणि आता त्याचे श्रेय मात्र ते स्वतः घेत आहेत. ‘श्रेय घ्या, हरकत नाही... पण कॉपी-पेस्ट करताना कमीत कमी कामाचा दर्जा तरी राखा!’ अशा शब्दांत त्यांनी शिवसेना (शिंदे गट) नेत्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. पालिकेतून मिळणारा निधी पूर्णपणे लोकसेवेसाठी वापरला पाहिजे, तेव्हाच कामाचा दर्जा चांगला राहतो, असेही घोरपडे म्हणाले.

हा कार्यक्रम हेंद्रेपाडा श्रावस्ती बुद्धविहार येथील संविधान उद्यानात भारतीय बौद्ध महासभा आणि बौद्धजन पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. घोरपडे पुढे म्हणाले, की आम्ही ज्या मानाने राजकारणात टिकून आहोत, निवडणुकीसाठी उमेदवारी घेण्यास पात्र आहोत, तसेच महिलादेखील ५० टक्के आरक्षणासहित आपले कौशल्य दाखवण्यासाठी उतरले आहेत, त्या सगळ्याचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आहे. त्यामुळे प्रत्येकाने संविधानाचा मान ठेवून संविधान दिन साजरा करावा, असा संदेशही दिला.

निवडणूक रंगतदार
निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात शिवसेना-राष्ट्रवादी युती आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. त्यातच घोरपडे यांच्या या ‘कॉपी-पेस्ट’ आणि ‘कामाच्या दर्जा’ वरील विधानामुळे राजकीय वातावरणाचे तापमान आणखी वाढले आहे. श्रेय घेण्याच्या राजकारणावरून पेटलेला हा वाद आगामी पाच दिवसांच्या प्रचारात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

Pune Latest News: युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बंदोबस्त वाढवला; शहरात किती इराणी लोक राहतात?

धक्कादायक! आई-वडिल अभ्यास कर म्हणाले, मोबाईल न दिल्याने १३ वर्षीय विद्यार्थ्याने केली आत्महत्या; मोहोळ तालुक्यातील पेनूरमधील घटना

Latest Marathi News Live Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT