मुंबई

वायूप्रदूषणामुळे श्‍वसनाच्या आजारांत वाढ

CD

वायुप्रदूषणामुळे श्‍वसनाच्या आजारांत वाढ
काळजी घेण्याचे तज्‍ज्ञांचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : मुंबईतील हवेची गुणवत्ता चिंताजनक होत चालली असून, शहरातील २१ पैकी तब्बल १० ठिकाणच्या हवेचा निर्देशांक खालावला आहे. वाढत्‍या वायूप्रदूषणामुळे ‘सीओपीडी’चा धोका वाढला असून, श्‍वसनाच्या आजारांपासून दूर राहण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन तज्‍ज्ञांनी केले आहे.
शहरातील बहुतांश भागांत हवा ‘मध्यम ते खराब’ या श्रेणीत असून, नागरिकांच्या आरोग्यासाठी धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. वाढते प्रदूषण, हवामानातील स्थिर हवा, बांधकामे, वाढती वाहनसंख्या यामुळे मुंबईत धूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
वाढते वायुप्रदूषण, बदलती शहरी जीवनशैली आणि श्वसन मार्गात धूलिकणांचा वाढता संपर्क यामुळे सीओपीडी (क्रॉनिक ऑब्स्ट्रॅक्टिव्ह पल्मनरी डिसीज) हा आजार होत आहे. सीओपीडी आता भारतात मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण ठरत आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे, अशी माहिती शिवडीच्या टीबी रुग्णालयातील माजी वैद्यकीय अधीक्षक, ज्येष्ठ फुफ्फुसरोग तज्ज्ञ डॉ. राजेंद्र ननावरे यांनी दिली. अशा वातावरणामुळे श्वसनमार्गात सूज येते, श्वास घेण्याची क्षमता कमी होते आणि आधीपासून असलेला सीओपीडी गंभीर स्वरूप धारण करतो, असे त्‍यांनी सांगितले.

महिलांमध्येही वाढते प्रमाण
सीओपीडी हा आधी पुरुषांमध्ये अधिक आढळणारा आजार होता. मात्र शहरांमधील वाढता वाहनांचा धूर, बांधकामाची धूळ आणि घरात वापरल्या जाणाऱ्या अगरबत्ती, सुगंधी मेणबत्त्या आणि एअर फ्रेशनरमधील रसायनांमुळे महिलांनाही दुहेरी प्रदूषणाचा फटका बसत असल्याचे ननावरे यांनी सांगितले. महिलांचे श्वसनमार्ग तुलनेने अरुंद असतात. त्यामुळे प्रदूषणाचा परिणाम त्यांच्यावर अधिक तीव्रतेने होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed news: 'Dhananjay Munde यांचा संबंध नाही, कराडच्या मुलानेच खून..'

Vaibhav Suryavanshi चे टीम इंडियात लवकरच पदार्पण? 'या' स्पर्धेत खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता; जाणून घ्या डिटेल्स

Ajit Pawar Plane Crash: पत्रकार परिषदेपूर्वीच जय पवार बोलले! विमान अपघाताची अधिवेशनात चर्चा का नाही? दिलं उत्तर

दादा कोंडकेंच्या निधनानंतर कुणाला मिळाली त्यांची कोट्यवधींची संपत्ती? दादांच्या मृत्युपत्रात नेमकं काय लिहिलेलं?

LPG Gas: सिलिंडर बुकिंगसाठी शहरात २५ दिवसांची अट; तर ग्रामीण भागात किती दिवस लागणार? संसदेत एलपीजी पुरवठ्याबाबत मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT