आमदार निकोलेंकडून रुग्णालय सुविधांचा आढावा
कासा, ता. २७ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील आशागड प्राथमिक आरोग्य केंद्राला आमदार विनोद निकोले यांनी गुरुवारी (ता. २७) भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला आणि उपचार व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. मागील महिन्यात निकामी झालेली वातानुकूलित यंत्रणा बदलून, आमदार निकोले यांनी स्वखर्चातून नवी यंत्रणा बसवली. त्यामुळे शस्त्रक्रिय गृहाची सुविधा पुन्हा सुरू झाली. तर मागील काही दिवसांपासून विस्कळीत झालेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा त्यांच्या पाठपुराव्यामुळे तात्काळ नियमित करण्यात आला.
निकोले यांनी आरोग्य केंद्रातील स्वच्छता, औषधसाठा आणि इतर सुविधांची पाहणी करून आवश्यक त्या सुधारणा वेळेत करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. यावेळी आशागडचे उपसरपंच दीपेश दोडा, सदस्य गौरव ठाकूर, ग्रामविकास अधिकारी राहुल पाटील आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. पांचाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.