मुंबई

अल्पवयीन मुलांना वाम मार्गाला लावणाऱ्या कल्याण पूर्वेतील गेम झोन वर पोलिसांची कारवाई

CD

गेम झोनवर पोलिसांची धाड
अल्पवयीनांना प्रवेश, प्रायव्हेट रूममधून गैरप्रकार ः तिघांना अटक
कल्याण, ता. २७ (वार्ताहर) : कल्याण पूर्वेकडील चिंचपाडा रोडवरील एका गेम झोनवर कोळसेवाडी पोलिसांनी छापा टाकून मालकासह तिघांना अटक केली आहे. या गेम झोनमध्ये अल्पवयीन मुलांना नियमबाह्य पद्धतीने प्रवेश देऊन प्रायव्हेट रूममध्ये गैरप्रकार सुरू असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करत तिघांना अटक केली आहे. पृथ्वीराज चव्हाण, श्रीराम चव्हाण आणि अमित सोनवणे अशी आरोपींची नावे आहेत.
कल्याण पूर्वेतील चिंचपाडा रोडवर एका बिल्डिंगच्या गाळ्यामध्ये या नावाने सुरू गेमझोनमध्ये कोणत्याही प्रकारची सुरक्षिततेच्या उपाययोजना किंवा नियमांचे पालन न करता अल्पवयीन मुला-मुलींना प्रवेश दिला जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक (गुन्हे) गणेश नहायदे, सपोनि दर्शन पाटील यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे मंगळवारी (ता. २५) पोलिस पथकाने छापेमारी केली.
दरम्यान, अटी आणि शर्तीचे उल्लंघन करणाऱ्या गेमिंग झोनवर कारवाई सुरू राहणार आहे. पालकांनीसुद्धा याबाबत सतर्क राहून मुलांवर विशेष लक्ष ठेवणे आवश्यक आहे, असे आवाहनही पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी पालकांना केलं आहे.

बंदीस्त रुम
धाडीदरम्यान गेमझोनच्या गाळ्यामध्ये १८ वर्षांखालील अल्पवयीन मुले-मुली हे आठ कॉम्युटरवर गेम खेळत असताना दिसून आले. तर, या गेमझोनमध्ये तळमजल्यावर एक बंद रूम होती. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची लाईटची व्यवस्था, व्हेन्टिलेशनची व्यवस्था, फायर सुरक्षा उपकरण, सीसीटीव्ही कॅमेरे इत्यादी उपाययोजना केल्याचे आढळून आले नाही. याशिवाय रूममध्ये मुला-मुलींच्या उपस्थितीत अशोभनीय प्रकार सुरू असल्याचे पोलिसांना आढळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुरज चव्हाणचं लग्न नव्हे तर इव्हेंट, लग्नात उपस्थित राहणार बॉलिवूडचे दिग्गज कलाकार, लग्नपत्रिकेतून सेलिब्रिटींनी दिलं आग्रहाचं निमंत्रण

AB de Villiers: 'इमोशनल कोच असणं फारसं चांगलं नसतं...' गौतम गंभीरबद्दल बोलताना डिविलियर्स नेमकं काय म्हणाला?

Latest Marathi News Live Update : नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता २ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

Kolhapur Politics : पायाला भिंगरी बांधून उमेदवारांची धावपळ; प्रॉपर्टी कार्ड ते स्वच्छता, मुद्द्यांनी तापली कोल्हापूरची निवडणूक!

Nagar Panchayat Election : नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर, मतदानाच्या टक्केवारी वाढीसाठी निर्णय

SCROLL FOR NEXT