मुंबई

डॉ. आशीष नाबर यांचे व्याख्यान

CD

डॉ. आशीष नाबर यांचे व्याख्यान
ठाणे (बातमीदार) ः हृदयविकार तज्ज्ञ डॉ. दयानंद कुंबळा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘डॉक्टर तुमच्या भेटीला’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या विनामूल्य उपक्रमात रविवारी (ता. ३०) सकाळी १०.३० वाजता सहयोग मंदिर या ठिकाणी हृदयविकार तज्ज्ञ डॉ. आशीष नाबर यांचे व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानानंतर उपस्थित श्रोत्यांच्या शंकांचे निरसन, प्रश्नोत्तरे कार्यक्रम होणार आहे.

-------------------
ठाण्यात ग्रंथाली वाचक दिन होणार साजरा
ठाणे : मराठी ग्रंथ संग्रहालय आणि ग्रंथाली यांच्या वतीने ५१वा ग्रंथाली वाचक दिन २९ आणि ३० नोव्हेंबरला मराठी ग्रंथसंग्रहालयात साजरा होणार आहे. २९ नोव्हेंबरला सायंकाळी साडेपाच वाजता या कार्यक्रमाचे उद्‍घाटन होणार आहे. त्या वेळी साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या वेळी तर्कतीर्थ : महाराष्ट्राचा वैचारिक वारसा - साहित्यिक किशोर बेडकीहाळ, वि. स. खांडेकर वाङ्मय : वाचन आणि पुनर्दृष्टी - प्रा. डॉ. रणधीर शिंदे, माझ्या दृष्टीने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आणि वि. स. खांडेकर - डॉ. सुनीलकुमार लवटे हे आपले विचार व्यक्त करणार आहेत. या वेळी चार पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. ३० नोव्हेंबरला साडेपाच वाजता साहित्य-कला संगम विषयावर परिसंवाद होणार आहे. त्यात साहित्यिक रोहिणी निनावे, अभिनेत्री अश्विनी महांगडे उपस्थित राहणार असून, निवेदक मकरंद जोशी त्यांना बोलते करणार आहेत. तर गझलकार सदानंद डबीर आणि संगीतकार विवेक गाजरेकर गझल संध्या संध्याकाळी सहा वाजता सादर करणार आहेत. हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Naik : भाजपनं एक इशारा दिला तर ठाण्यातून नामोनिशाण मिटवेन, गणेश नाईकांनी पुन्हा शिंदेंना डिवचलं

Snowstorm in America : अमेरिकेला हिमवादळाचा तडाखा! शेकडो विमान उड्डाणे रद्द; हजारो घरांचा वीजपुरवठा खंडित

Kolhapur ZP : महिला मतदारांना वाटायला आणलेल्या साड्या, साडे सहा लाखांचा माल जप्त; टेंपो कुणाचा?

प्रजासत्ताक दिनी Googleचं खास सरप्राइज! अनोखं डूडल पाहून तुम्हीही थक्क व्हाल, जाणून घ्या अर्थ

अभिषेक शर्मानं मोडला कॅनडाच्या क्रिकेटरचा विश्वविक्रम, २० चेंडूंच्या खेळीत प्रत्येक चेंडूवर काढली धाव

SCROLL FOR NEXT