मुंबई

विजेच्या खांबावरून कोसळून कर्मचारी गंभीर जखमी

CD

विजेच्या खांबावरून कोसळून कर्मचारी गंभीर जखमी
कल्याण, ता. २७ (बातमीदार) : छत्रपती शिवाजी महाराज कॉलनी परिसरात बुधवारी (ता. २६) वीज वितरण कंपनीचा खांब अचानक मुळासकट कोसळल्याने त्यावर दुरुस्तीचे काम करणारा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात नूतन ज्ञान मंदिर शाळेसमोरील रस्त्यावर घडला असून वीज वितरण कंपनीच्या कारभारावर स्थानिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
वीज वितरण कंपनीच्या कोळसेवाडी विभागातील या परिसरात अनेक पोल जुने व जीर्ण झाले आहेत. दुरुस्तीच्या कामाचा एक भाग म्हणून ठेकेदाराने नियुक्त केलेला कर्मचारी बुधवारी एका पोलवर चढला, यावेळी पोल अचानक मुळासकट हलला आणि त्या कर्मचाऱ्याचा तोल जाऊन तो बाजूच्या घराच्या पत्र्यावर पडून गंभीर जखमी झाला. अपघातात घराच्या पत्र्याचेही नुकसान झाले असून कर्मचाऱ्याला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वीजपुरवठा दिवसभर खंडित
या दुर्घटनेमुळे परिसरातील वीजपुरवठा दिवसभर खंडित झाला होता. अखेर अपघातग्रस्त खांबाला तात्पुरता आधार देऊन वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, खांबाच्या दुरुस्तीच्या कामावेळी सुरक्षात्मक साधनांचा वापर न केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी परिसरात जोर धरू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT