मुंबई

पुलावरून वाहतेय राजकारण

CD

पुलावरून वाहतेय राजकारण
ठाकुर्ली उड्डाणपुलावरून भाजपा शिवसेनेत फलक युद्ध
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २७ ः कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिंदे गटातील तणाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या ठाकुर्ली उड्डाणपुलाचे काम हा या दोन्ही पक्षांतील शीतयुद्धाचा केंद्रबिंदू ठरला आहे. असे असले तरी या पुलाचे काम प्रत्यक्षात पूर्ण कधी होईल? हा सवाल मात्र अनुत्तरीतच आहे.
ठाकुर्ली रेल्वे फाटक बंद झाल्यानंतर वाहतुकीचा भार हलका करण्यासाठी उड्डाणपुलाची संकल्पना सात-आठ वर्षांपूर्वी पुढे आली. भूमिपूजनानंतर रेल्वेच्या मदतीने ठाकुर्ली स्थानकापर्यंतचा पहिला टप्पा पूर्णही झाला. मात्र, स्थानक ते म्हसोबा चौक हा मुख्य टप्पा जागा हस्तांतरण, पुनर्वसन, पालिकेच्या आर्थिक अडचणींमुळे रखडला आहे. या पुलांसाठी नुकताच एमएमआरडीएकडून ३६ कोटींचा निधी जाहीर झाला आहे. यामुळे या पुलाच्या उभारणीला गती येणार असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि भाजपमध्ये पोस्टरयुध्द सुरु झाले आहे. दरम्यान, दोन्ही पक्ष एकमेकांवर ताशेरे ओढण्यात व्यस्त असताना, प्रत्यक्ष उड्डाणपूलाचे काम कधी पूर्ण होणार? हा मूळ प्रश्न नागरिकांसमोर अजूनही अनुत्तरीतच आहे.

शिंदे गटाचा अप्रत्यक्ष निशाणा
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील रखडलेल्या ठाकुर्ली उड्डाणपुलाच्या कामासाठी एमएमआरडीएकडून निधी मंजूर केल्याचे शिंदे गटाने सांगितले. यानंतर शिंदे गटाने सोमवारी (ता. २४) डोंबिवलीत जनता ओळखते विकासाचा खरा योद्धा कोण आणि आमचे काम बोलते, अशा आशयाचा फलक लावला. व यावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विकास कामांचा उल्लेख करत रवींद्र चव्हाण यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.

भाजपचे प्रत्युत्तर
या फलकाने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला असून प्रत्युत्तरा दाखल मंगळवारी (ता. २५) रात्री ठाकुर्ली परिसरात फलक लावण्यात आला. माजी नगरसेविका रेखा चौधरी, प्रमिला चौधरी, खुशबू चौधरी आणि साई शेलार यांच्या नावाने लागलेल्या या फलकांमध्ये भाजपने काही प्रश्न उपस्थित केले. २०१४ पासून उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी का लागला नाही? मुख्यमंत्री शिंदे यांच्या काळात डोंबिवलीतील ३७२ कोटींचा निधी कोण रोखून धरत होते? १२ वर्षे रखडलेला पूल निवडणुका जवळ आल्या म्हणूनच आठवला का? याच माध्यमातून विकासाचा खरा योद्धा कोण आणि अडथळा कोण हे जनता ओळखते, असा टोला भाजपने शिंदे गटाला लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Crime : बारामती तालुका पोलिसांनी प्रेमी युगुलाला लुटणा-या तिघांना काही तासात केले गजाआड....

Mathura Holika Dahan: जळत्या होळीमध्ये चालतो माणूस; मथुरेतील 'या परंपरेमागचं रहस्य काय? ४५ दिवसही करतो अन्नत्याग

ISRO मध्ये वैज्ञानिक असल्याचे सांगत लग्नाचं आमिष; पुण्यातील महिलेकडून ४२ लाख रुपये उकळले...

IND vs ENG, Semi: भारताने इंग्लंडविरुद्ध कोणती Playing XI खेळवावी? रवी शास्त्री, रिकी पाँटिंग यांचा सल्ला; म्हणाले, अभिषेकला तर...

विकी कौशल चिमुकलीच्या चक्क पडला पाया! स्टेजवरचा तो क्षण पाहून सगळेच झाले भावूक, Viral Video

SCROLL FOR NEXT