मुंबई

कर्जतमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप थेट आमने-सामने

CD

कर्जतमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप थेट आमने-सामने
कैलास म्हामले : कर्जत (बातमीदार) ः कर्जत नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय तापमान चांगलेच तापले आहे. दोन प्रमुख आघाड्यांमध्ये थेट सामना रंगला आहे. परिवर्तन विकास आघाडीमधून शिवसेना ठाकरे गट-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पाठिंब्याने राष्ट्रवादीच्या पुष्पा दगडे या नगराध्यक्ष पदाच्या सरळ उमेदवार आहेत. तर महायुतीकडून शिवसेना शिंदे गट, भाजप आणि आरपीआय यांच्या समर्थनाने भाजपच्या डॉ. स्वाती लाड या नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहेत. त्यामुळे कर्जतमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी निवडणुकीची सरळ लढत पाहायला मिळत आहे.
दोन्ही बाजूंचे बडे नेते कर्जतच्या रणांगणात दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार कर्जतमध्ये सभा घेणार आहेत, तर भाजपचे आशिष शेलार हेही बैठकांचे सत्र घेणार आहेत. महायुतीतील नेतेच एकमेकांसमोर उभे ठाकल्याने राजकीय वातावरण अधिक तापले आहे. राष्ट्रवादीतर्फे सुनील तटकरे यांनी कर्जत नगरपरिषद काबीज करण्यासाठी मोठी ताकद झोकून दिली आहे. तर भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर हे कर्जतमध्ये तळ ठोकून प्रचारात व्यग्र आहेत. रविवारी होणाऱ्या सभेला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पक्षाच्या रणरागिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चित्रा वाघ या उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात प्रचाराला मोठी गती मिळणार आहे. स्थानिक पातळीवरही प्रचाराचा जोरदार गजर सुरू आहे. माजी आमदार सुरेश लाड आणि आमदार महेंद्र थोरवे हे घराघरांत जाऊन प्रचार करत आहेत. तर परिवर्तन विकास आघाडीतील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, तसेच शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख रायगड नितीन सावंत हेही प्रचारात आघाडीवर आहेत. त्यामुळे कर्जतमध्ये लढत अधिकच चुरशीची झाली आहे. कर्जत नगरपरिषदेमध्ये १० प्रभागांतील २१ जागांसाठी एकूण ४६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी ४ उमेदवार अपक्ष असून ४२ उमेदवार विविध पक्षांकडून अधिकृतरित्या उभे आहेत. निवडणूक शांत, खेळीमेळीच्या वातावरणात पार पडत असली तरी राजकारणात काटे की टक्कर स्पष्टपणे जाणवत आहे. कर्जतचे राजकीय चित्र पाहता, अंतिम क्षणांपर्यंत ही लढत चुरशीची राहणार हे निश्चित.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : वेतनवाढीपूर्वीच कर्मचाऱ्यांना मोठा धक्का ! 'या' मुद्द्यावर सरकारने दिला स्पष्ट नकार

Success Story: श्वेता पवार खेळाडू कोट्यातून राज्यात प्रथम; पोलिस उपनिरीक्षकपदी निवड, संघर्षातून एमपीएससीमधील तिसरे यश!

Latest Marathi News Live Update : कोल्हापूरमध्ये बनावट नोटा जप्त, दोघांना अटक

बंगालमध्ये भाजपचा 'खेला'; ममतांचा पराभव करण्यासाठी काढला हुकुमाचा एक्का, कोण आहेत सुवेंदू अधिकारी?

Whatsapp Guest Chats : आता अकाऊंट नसताना चालणार WhatsApp! नंबर सेव्हपासून अन् ॲप डाउनलोड करण्यापर्यंतच टेन्शन संपणार, जाणून घ्या कसं?

SCROLL FOR NEXT