मुंबई

माथेरानच्या वस्तूंना पेटंटद्वारे जागतिक बाजारपेठेत नेण्याचा संकल्प

CD

माथेरानच्या वस्तूंना पेटंटद्वारे जागतिक बाजारपेठेत नेण्याचा संकल्प
सुनील तटकरे यांची जाहीर सभेत महत्त्वपूर्ण घोषणा
कर्जत, ता. २७ (बातमीदार) ः आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवराष्ट्र पॅनलच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी शहराच्या विकासाबाबत अनेक घोषणा केल्या. माथेरानमध्ये तयार होणाऱ्या चामड्याच्या वस्तू, चिक्की यांसारख्या स्थानिक उत्पादनांना ‘पेटंट’ मिळवून त्यांना जागतिक दर्जा देण्याचा आमचा निर्धार आहे, असे ते यावेळी म्हणाले. महिला-बालकल्याण विभागाच्या माध्यमातून स्थानिक महिलांना प्रशिक्षण देण्याबरोबरच त्यांना सक्षम मार्केट उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
माथेरानमध्ये आयोजित (ता.२५) श्रीराम चौकातील सभेत बोलताना त्यांनी शिवराष्ट्र पॅनलने जाहीर केलेल्या विविध योजना येत्या तीन महिन्यांत सुरू होतील, असे आश्वस्त दिले. रोपवेच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी विरोधकांवर टोलाही लगावला. रोपवे करण्यासाठी नजर लागते… पण काहींची नजर वेगळ्याच दिशेला असते, असे तटकरे म्हणाले. माथेरानमधील प्रशासकीय बदल, मागील तीन वर्षांत तीन मुख्याधिकारी बदलले जाणे, रस्त्यांची कामे यावर त्यांनी सविस्तर बोलताना काही लोकांच्या आक्षेपांना ऐतिहासिक संदर्भ देऊन उत्तर दिले. कोकण पॅकेजमधून घाटरस्ता रुंद आणि सुरक्षित करण्याचे काम आमच्या पालकमंत्री काळात झाले. आज जगभरातून लोक माथेरानला येतात, पण पूर्वीची परिस्थिती किती कठीण होती हे विसरू नये, असे ते म्हणाले. नवीन सुविधा आल्याने पारंपरिक व्यवसायावर परिणाम होईल का, या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट हमी दिली की, रिक्षा आल्या म्हणून घोडेवाल्यांचा व्यवसाय थांबणार नाही. त्यांचा कोणताही प्रश्न दुर्लक्षित होणार नाही. अजय सावंत यांच्या नेतृत्वाबद्दल बोलताना ते म्हणाले की, काहींची सकाळ दुपारी होते; पण आमचे नेते अजित पवार सकाळी सहा वाजल्यापासून कार्यकर्त्यांमध्ये असतात. अजय सावंत यांच्यातही तीच कार्यतत्परता आहे. कोरोनानंतर माथेरान हे अधिक आकर्षक पर्यटन स्थळ म्हणून उभारले असून, महिला आणि तरुणींसाठी सुरक्षित शहर बनवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Panchayat Samiti: शिंदे किंगमेकर! भाजपचे सर्वाधिक सदस्य तरीही काँग्रेसचा उमेदवार विजयी; २१ वर्षांची तरुणी सभापती

Baliraja Mofat Veej Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! बळीराजा मोफत वीज योजनेचे नियम स्पष्ट; देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या अटी

तुमच्याशिवाय पुढचं आयुष्य कसं जाईल... T20 WC जिंकल्यानंतर रिंकू सिंगची वडिलांसाठी भावूक पोस्ट

‘महाराष्ट्र-गोवा बार’साठी २४ मार्चला मतदान; १५५ उमेदवार, १.८० लाख मतदार, निवडणुकीत सोलापूरचे सात उमेदवार; मतदान कसे होते? वाचा...

Jafrabad Accident : टेंभुर्णी जाफराबाद रोडवर अपघात; पिता पुत्राचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT