मुंबई

मतदार यादी दुरुस्त न झाल्यास न्यायालयात जाणार

CD

मतदार यादी दुरुस्त न झाल्यास न्यायालयात जाणार
मनसे नेते अविनाश जाधव यांचा पालिकेला इशारा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : महापालिकेने नुकत्याच जाहीर केलेल्या मतदार यादीतील गंभीर त्रुटी, मर्यादित प्रतींची उपलब्धता आणि हरकतींसाठी दिलेली केवळ सात दिवसांची तोकडी मुदत यामुळे इच्छुक उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. महापालिका प्रशासन यावर कोणतीही भूमिका घेत नसल्याचे पाहून मनसे नेते तथा ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पालिका आयुक्तांना पत्राद्वारे मतदार यादीतील आवश्यक दुरुस्त्या न झाल्यास न्यायालयात दाद मागितली जाईल, असा इशारा दिला आहे.

मनसे नेते अविनाश जाधव यांनी पत्रात मतदार यादीतील गंभीर त्रुटी दाखवत प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मतदार यादीत सीमारेषेबाहेरील मतदार, संबंधित भागाशी संबंध नसलेली नावे तसेच मोठ्या प्रमाणावर दुबार नोंदी आढळत आहेत. अनेक मतदारांचे फोटो अनुपस्थित असल्याने त्यांच्या मतदानाची वैधता काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुबार नावे चिन्हांकित असली तरी दुबार मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोगाकडे कोणती उपाययोजना आहे, याबाबत स्पष्ट माहिती मिळत नसल्याची तक्रार मनसेने केली आहे. मतदार यादी अ, ब, क, ड अशा वर्गवारीत सुव्यवस्थित दिली जात नसल्याने पडताळणी प्रक्रियेला अडथळा येत आहे.

प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न
निवडणुका २०२५मध्ये होणार की २०२६मध्ये, याबाबत स्पष्टता नसताना महापालिकेने २० नोव्हेंबर २०२५ला मतदार यादी जाहीर केली. प्रभागनिहाय मतदार याद्यांच्या प्रतींसाठी मोठी गर्दी असून, मागणीच्या तुलनेत प्रतींची कमतरता आहे. अनेकांना प्रत मिळवण्यासाठी एक-दोन दिवसांनी येण्यास सांगितले जात आहे.

घाई आणि तोकडा कालावधी
याद्या कधीपर्यंत उपलब्ध होतील, याबद्दल कोणतीही स्पष्टता नसताना आक्षेप आणि हरकती दाखल करण्याची अंतिम तारीख २७ नोव्हेंबर २०२५ दुपारी ३ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. यादी उशिरा मिळालेल्यांनी आक्षेप कसे दाखल करायचे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. निकोप निवडणूक प्रक्रियेपेक्षा एखाद्याच्या फायद्यासाठी घाई केली जात आहे का, असा सवाल अविनाश जाधव यांनी करीत आक्षेपांसाठी दिलेला तोकडा कालावधी उद्देशपूर्वक ठेवल्याचा आरोप केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas: गॅस तुटवड्याच्या काळात उज्ज्वला गॅस योजनेचं काय झालं? खडसे यांनी उपस्थित केला महत्त्वाचा मुद्दा, म्हणाल्या...

VIDEO : लिफ्टमध्ये अडकला सात महिन्यांच्या चिमुकल्याचा हात, पुण्यातील घटना; धडकी भरवणारा व्हिडीओ समोर...

"आई आगीत होरपळलेली आणि मला लीड रोल मिळाल्याचा फोन आला" शुभविवाह फेम अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

Dhule Bus Stand : धुळ्यातील एसटी प्रवासाचा कायापालट! चार स्थानकांचा 'एअरपोर्ट' सारखा विकास, ९० नवीन बसेस दाखल

LPG टंचाईमुळे शिर्डी साई मंदिराचा मोठा निर्णय! आता एकच लाडू प्रसाद मिळणार; प्रसादालयाच्या मेनूमध्येही मोठा बदल

SCROLL FOR NEXT