मुंबई

जिल्हा रुग्णालयात सात महिन्यांत ४२७१ गरजूंवर मोफत शस्त्रक्रिया

CD

जिल्हा सामान्य रुग्णालय ठरतंय वरदान
सात महिन्यांत ४,२७१ मोफत शस्त्रक्रिया
जिल्हा रुग्णालयात सात महिन्यांत ४,२७१ गरजूंवर मोफत शस्त्रक्रिया
ठाणे शहर, ता. २७ (बातमीदार) : महागड्या उपचारांसाठी गरजूंची भटकंती होऊ नये, यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय वरदान ठरत आहे. गेल्या सात महिन्यांत रुग्णालयात चार हजार २७१ गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करून त्यांना जीवनदान दिले आहे. तसेच या कालावधीत एक हजार ८६४ जणींच्या सुखरूप प्रसूती करण्यात आल्या आहेत.
जिल्हा रुग्णालयाच्या जागेत सुपरस्पेशालिटी रुग्णालयाची सुसज्ज इमारत उभी राहत आहे. इमारतीचे काम सुरू असून, रुग्णांची परवड होऊ नये यासाठी हे रुग्णालय वागळे इस्टेट येथे उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या तंबूत सुरू करण्यात आले आहे. तरीही उपचारांत कोणताही कसूर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी केला नाही. तात्पुरत्या जागेत येथील डॉक्टरांनी चार हजार २७१ शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यामध्ये किरकोळ एक हजार ९४५ आणि गंभीर दोन हजार ३२६ शस्त्रक्रियांचा समावेश आहे.

५०० ते ६०० रुग्ण उपचारासाठी
रोज ५०० ते ६०० रुग्ण उपचारासाठी येत असून, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिन्याला ६००हून अधिक रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. यात लेप्राटॉमी, हर्निया, टॉमी, सिझरियन सेक्शन, हायड्रोसिल अशा गंभीर शस्त्रक्रियांचा समावेश आहे. तर किरकोळमध्ये डिब्रायमेंट, इंसिजन अँड ड्रेनेज आदींचा समावेश आहे.

शस्त्रक्रिया :
एप्रिल - ५८४
मे - ५३७
जून - ६२०
जुलै - ६७६
ऑगस्ट - ५२४
सप्टेंबर - ६७२
ऑक्टोबर - ६३७

प्रसूती :
२५८
२३६
२४७
२२०
२६८
३१६
३१९

एकूण शस्त्रक्रिया - ४,२७१
प्रसूती - १,८६४

जिल्हा सामान्य रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांना सेवा देत आहेत. गरिबांना खासगी रुग्णालयात न परवडणाऱ्या शस्त्रक्रिया येथे मोफत होतात. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानली जाते. तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक सदैव तैनात असते.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War : इराण-इस्रायल युद्धामुळे बळीराजा अडचणीत; नाशिकचा शेतीमाल विमानतळावरच अडकला

Latest Marathi News Live Update : एसबीएल आयुध कारखाना स्फोट प्रकरणात 11 जण अटकेत, मुख्य आरोपी आलोक चौधरी फरार

Israel-Iran Tension : युद्धजन्य परिस्थितीचा सातारा सांगली रत्नागिरीच्या 26 जणांना फटका; तीन दिवसापासून विमानसेवा बंद असल्यामुळे अडकले, : नातेवाईक चिंतेत

Pune Dubai Flights Suspended : इस्रायल-इराण युद्धाचा फटका ! पुणे-दुबई विमानसेवा सलग चौथ्या दिवशी बंद, प्रवाशांच्या अडचणीत वाढ

Former ZP Member Assault Pune : पुण्यात माजी जिल्हा परिषद सदस्याकडून मोठ्या भावाला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

SCROLL FOR NEXT