भटक्या श्वानांच्या उपद्रवावर तोडगा
पनवेल परिसरात महापालिकेकडून ‘फिडींग पॉइंट’
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता.२७ : भटक्या श्वानांच्या समस्येवर नियंत्रणासाठी पनवेल महापालिकेत प्राणी जन्म संनियंत्रण समितीची बैठक आयुक्त मंगेश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत प्राणी जन्म नियंत्रण, श्वानांचे लसीकरण, निर्बिजिकरणाबरोबर फिडींग पॉइंट उभारण्यावर चर्चा झाली.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भटक्या श्वानांना खाऊ घालण्यासाठी जागा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी पशुप्रेमींनी महापालिका पशुवैद्यकीय विभागाकडे अर्ज करणे आवश्यक आहे. पालिकेने त्याबाबतचा अर्जाचा नमुना उपलब्ध करून दिला आहे. या ठिकाणांव्यतिरिक्त इतर ठिकाणी श्नानांना अन्न टाकल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच नागरिकाच्या सहभागासाठी हेल्पलाइन क्रमांक दिला जाणार आहे.
-----------------------------
बैठकीतील मुद्दे
- भटक्या श्वानांना योग्य व्यवस्थापनासाठी शेल्टर-निवाऱ्याची उभारणीनंतर शाळा, रुग्णालये, रेल्वे स्टेशन, बस डेपो, क्रीडा संकुले, गर्दीच्या ठिकाणांवरील भटके श्वान पकडून त्यांचे निर्बिजीकरण, लसीकरणाबरोबर सुरक्षित निवाऱ्यात ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
- रेबीज विषयी जनजागृती करून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत माहिती पोहचवण्याच्या दृष्टीने विविध कार्यक्रम राबविण्याबाबत येणार आहेत.
------------------------------
श्वान निर्बिजिकरण - १२ हजार ७००
रेबीज लसीकरण - १५ हजार ६७९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.