मुंबई

सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार

CD

जो उबाठासोबत गेला तो भुईसपाट झाला
कर्जतमध्ये सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांचा टोला

कर्जत, ता. २७ (बातमीदार) ः महायुतीच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे. जो जो उबाठासोबत गेला, तो भुईसपाट झाला, अशा शब्दांत सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. कर्जत शहरात त्यांच्या चार सभा झाल्या.
कर्जतमध्ये राम गणेश गडकरी नाट्यगृह बांधणार, तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या, सिमेंट काँक्रीटचे रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा, पर्यावरण संवर्धनासाठी ठोस आराखडा करून ही विकासकामे मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन शेलार यांनी दिले.
ते पुढे म्हणाले, हर घर नळ योजना राबवण्यात आली आहे. कर्जतमध्ये विविध विकासकामांची सुरुवात माजी आमदार सुरेश लाड यांनी केली. पुढे आमदार प्रशांत ठाकूर आणि महेंद्र थोरवे यांनी या सर्व कामांना गती दिली. विकासाचा खंड आम्ही पडू देणार नाही. कर्जतचा पर्यटन व्यवसाय वाढवण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेलार यांच्या दौऱ्याची सुरुवात गुंडगे प्रभागातील लालजी पाल यांच्या निवासस्थानी झालेल्या सभेपासून झाली. त्यानंतर भिसेगाव येथील आंबेमाता मंदिराच्या सभागृहात, मग रॉयल गार्डनच्या हॉलमध्ये कर्जत शहर व मुद्रे प्रभागांसाठी, तर अखेर दहिवली येथे संकल्प भवनात शेवटची सभा झाली. या सभांना आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड, जिल्हाप्रमुख अविनाश कोळी, आरपीआयचे राहुल डाळिंबकर, कर्जत विधानसभा संघटक किरण ठाकरे, वसंत भोईर, दीपक बेहरे, तसेच नगराध्यक्षपदाच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. स्वाती लाड यांसह महायुतीच्या सर्व प्रभागातील उमेदवार उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर 'त्या' शिक्षकावर गुन्हा दाखल; विद्यार्थिनीला मारहाण केल्याचं प्रकरण; 'सकाळ'ने घटना आणली होती समोर

Yavatmal Crime : जुन्या वादातून तरुणाचा खून; आरोपी अटकेत

३० नंतर टीम इंडियात एंट्री; ३५ व्या वर्षी विश्वचषक जिंकणारा कर्णधार... सूर्यकुमार यादवचा संघर्ष ते विश्वविजय प्रवासाची प्रेरणादायी यशोगाथा

मुलीची लग्नपत्रिका वाटून परतत होते; मात्र वाटेतच काळानं गाठलं, लग्नाआधीच लेकीचं पितृछत्र हरपलं

Akola News : ‘चिटफंड’चा वाद पेटला, प्रकरण पोलिस स्टेशनपर्यंत; ‘बीसी’चे पैसे न मिळाल्याने ग्राहक हैराण

SCROLL FOR NEXT