चर्चगेट स्थानकातील आगींमुळे विद्युत सुविधांच्या दर्जावर प्रश्न
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकात आगीच्या घटना वाढत आहेत. छोट्या-मोठ्या ठिणग्यांपासून सुरू होणाऱ्या या दुर्घटना प्रत्येक वेळी वेगळ्या ठिकाणी घडत असल्या तरी जुनी, कमकुवत आणि वाढत्या भाराला न पुरणारी विद्युत पायाभूत सुविधा यास कारण असल्याचे माहीतगार सांगतात.
स्थानकातील वाढती गर्दी, एलईडी जाहिरात फलक, कँटीन व कार्यालयांमधील अतिरिक्त उपकरणे तसेच वाढत्या वातानुकूलित व्यवस्था यामुळे विजेचा ताण दररोज वाढत आहे; मात्र त्यानुसार नेटवर्क अद्ययावत करण्याची गरज रेल्वे खात्याने गांभीर्याने घेतलेली नाही. जवळपास दशकभर जुन्या सुविधांवरच नवे भार टाकले जात आहेत. रेल्वे कर्मचारी सांगतात, की घटना घडल्यानंतर चौकशी सुरू होते, जबाबदारी ढकलली जाते आणि छोट्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करून प्रकरण संपवले जाते. खरी समस्या म्हणजे कालबाह्य झालेली वायरिंग आणि कमी क्षमतेची उपकरणे. त्याची कसलीही दखल घेतली जात नाही, अशी माहिती नाव न सांगण्याचा अटीवर पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
...
निर्णय फक्त कागदावरच
स्टेशन इम्प्रुव्हमेंट ग्रुपच्या (एसआयजी) बैठकीतही चर्चगेटच्या विद्युत पायाभूत सुविधांबाबत अनेकदा सूचना दिल्या आहेत. स्टेशन मॅनेजर, वीज विभाग, आरपीएफ आणि तपास अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या या समितीने वेळोवेळी तातडीने बदल आवश्यक असल्याचे नमूद केले आहे; पण निर्णय कागदावरच अडकले असल्याचे रेल्वे सूत्रांचे मत आहे. वाढत्या आगीच्या घटनांमुळे प्रवासी आणि कर्मचारी या दोघांमध्येही भीतीचे वातावरण आहे. योग्य देखभाल, उच्च क्षमतेच्या केबल्स आणि दर्जेदार उपकरणांचा वापर न झाल्यास आणखी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता रेल्वे तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
...
गेल्या काही महिन्यांतील आगी
२६ नोव्हेंबर - बुकिंग कार्यालयातील वातानुकूलित यंत्राला आग
१७ जुलै - परिसरातील एका स्टॉलला आग
५ जून - स्थानक परिसरातील केक शॉपमध्ये आग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.