मुंबई

काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी राजाभाऊ पातकर

CD

सरळगाव, ता. २७ (बातमीदार) : कल्याण-डोंबिवली काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजाभाऊ पातकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांनी ही नियुक्ती जाहीर केली असून, नियुक्तीपत्र पातकर यांना प्रदान करण्यात आले आहे.
नियुक्तीची माहिती मिळताच पातकर यांच्या कार्यालयात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. बहुजन समाजातील एका कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्याने त्यांनी पक्षाचे आभार मानले. या वेळी पातकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, पक्ष बळकटीकरणासाठी ही मोठी संधी असून, माजी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी राजीनामा दिला असला तरी त्यांना आणि सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटना मजबूत करण्यासाठी काम करणार आहे. पुढे बोलताना त्यांनी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीतील काँग्रेसच्या भवितव्याबद्दल आत्मविश्वास व्यक्त केला. आगामी महापालिकेत जो महापौर बसेल, त्यात काँग्रेसचा सिंहाचा वाटा असेल, असा विश्वास पातकर यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL २०२६ शेड्यूल कधी जाहीर होणार? तारीख आली समोर; BCCI सचिवांनी मोठा ट्विस्टही सांगितला!

Mutual Fund: फेब्रुवारीत गुंतवणूकदारांचा बदलला मूड! कोणत्या फंडांमध्ये वाढली गुंतवणूक? गोल्ड ETF गुंतवणुकीत मोठा बदल

Kannad News : कन्नडमध्ये अखेर युतीचं सुत जुळलं; सुप्रिया घुगे सभापती तर माया सुराशे उपसभापती

Horoscope : मिथुन राशीत गुरु मार्गी गोचर; 11 मार्चपासून धनुसह 'या' 5 राशींसाठी शुभलाभ संयोग, धनलाभ, कामात यश अन् जीवनात मोठा बदल

मोठी बातमी : T20 World Cup विजेत्या भारतीय खेळाडूवर आयसीसीची दंडात्मक कारवाई! 'ती' चूक महागात पडली

SCROLL FOR NEXT