मुंबई

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे प्रकरण

CD

स्थानिकबाबतच्या तक्रारींवर उच्च न्यायालयाची नाराजी 

मुंबई, ता. २७ ः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी संबंधित विविध मुद्द्यांबाबतच्या याचिकांवर तातडीने सुनावणी घेत नसल्याची तक्रार याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केल्याबद्दल उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. २७) नाराजी व्यक्त केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी संबंधित अनेक याचिका दाखल झाल्या असून त्यावर तातडीने सुनावणी घेणे अडचणीचे ठरत असल्याचे न्यायालयाने नाराजी व्यक्त करताना नमूद केले. 
न्यायालयासमोर आतापर्यंत ७०हून अधिक याचिका आल्या आहेत. ही संख्या लक्षात घेता याचिकांवर तातडीने सुनावणी शक्य नाही. शिवाय, निवडणुकीबाबत याचिकाकर्त्यांना कल्पना असतानाही त्यांनी अंतिम क्षणी याचिका केल्या. आरक्षण, प्रभाग सीमांकन आणि मतदार यादी अशी याचिकांची वर्गवारी करून आजपासून आरक्षणाशी संबंधित याचिकांवर सुनावणी घेत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानुसार न्यायालयाने जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या संदर्भातील रोटेशन आरक्षण देण्यासंदर्भातील याचिकांवर सुनावणीला सुरुवात केली आणि प्रकरणाची शुक्रवारी सुनावणी पार पडणार आहे.  दरम्यान, २०२५मध्ये सरकारने नवीन नियमानुसार रोटेशनने आरक्षण थांबवले. परिणामी, पूर्वी आरक्षित असलेल्या जागा पुन्हा आरक्षित होणार आहेत. सरकारचा हा नियम रोटेशन आरक्षणाचे उल्लंघन करणारा असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL २०२६ शेड्यूल कधी जाहीर होणार? तारीख आली समोर; BCCI सचिवांनी मोठा ट्विस्टही सांगितला!

Mutual Fund: फेब्रुवारीत गुंतवणूकदारांचा बदलला मूड! कोणत्या फंडांमध्ये वाढली गुंतवणूक? गोल्ड ETF गुंतवणुकीत मोठा बदल

Kannad News : कन्नडमध्ये अखेर युतीचं सुत जुळलं; सुप्रिया घुगे सभापती तर माया सुराशे उपसभापती

Horoscope : मिथुन राशीत गुरु मार्गी गोचर; 11 मार्चपासून धनुसह 'या' 5 राशींसाठी शुभलाभ संयोग, धनलाभ, कामात यश अन् जीवनात मोठा बदल

मोठी बातमी : T20 World Cup विजेत्या भारतीय खेळाडूवर आयसीसीची दंडात्मक कारवाई! 'ती' चूक महागात पडली

SCROLL FOR NEXT