चाैकट
ज्ञानेश्वर म्हात्रे अलिप्त
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला भाजपाचे विधान परिषदेचे शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे अनुपस्थित होते, याबाबत चांगलीच चर्चा रंगली. तर व्यासपीठावर आमदारांसाठी विशेष जागेची व्यवस्था नसल्याचेही बोलले जात आहे. प्रचाराला सुरुवात झाल्यापासून आमदार म्हात्रे एकाही भाजप कार्यक्रमात दिसले नाहीत. याबाबत पक्षातील वरिष्ठांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
---
राजकीय पेच
ज्ञानेश्वर म्हात्रे हे शिवसेना शिंदे गटाच्या शहरप्रमुखांचे बंधू आहेत. पालिका निवडणुकीत भाजप–राष्ट्रवादी–आरपीआय महायुती आणि शिवसेना शिंदे गट आमनेसामने लढत आहेत. म्हात्रेंसाठी ही राजकीय परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनली आहे. शिवाय आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या घरातील सहा उमेदवार शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत असल्याने दोन्ही पक्षांतील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. अशा पार्श्वभूमीवर भाजपा आमदार म्हणून निवडून आल्यावरही म्हात्रे पक्षाच्या प्रचारात न दिसणे, हा मुद्दा स्थानिक तसेच जिल्हास्तरीय भाजप नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण करणारा ठरत आहे. त्यामुळे आगामी काळात पक्षातील त्यांचे स्थान आणि भविष्यातील राजकीय भूमिका काय असेल, याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.